वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी यजमान संघाने आपला संघ जाहीर केला असून, अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंग याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. वनडे विश्वचषक पात्रता फेरीतील अपयशानंतर ऍण्ड्रू बालबिर्नी याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला.
या मालिकेसाठी आयर्लंड संघ घोषित करताना अनुभवी पॉल स्टर्लिंग याच्याकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली. बालबिर्नी याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता तो ही जबाबदारीने निभावेल. या संघात अष्टपैलू बंधू मार्क व रॉस अडायर यांना निवडले गेले आहे. वेगवान गोलंदाज जोश लिटल व क्रेग यंग ही जोडी पुन्हा एकदा संघाला मजबूत बनवेल. अनुभवी सलामीवीरांसह युवा टकर व टेक्टर मध्य फळी सांभाळतील.
या मालिकेतील सामने 18, 20 व 23 ऑगस्ट यादिवशी डब्लिन येथे होतील. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे सोपवले आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आयर्लंड संघ:
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), ऍण्ड्रू बालबिर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथडेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लोरकनटकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट, क्रेग यंग.
ireland Announced Sqaud For India Series Paul Sterling Lead
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात है! विस्फोटक खेळीनंतर तिलकला दक्षिण आफ्रिकेहून कुणी पाठवला व्हिडिओ मेसेज? वाचा बातमी
विंडीजने मोडला भारताचा गर्व! 200व्या सामन्यात रोखला विजयरथ; काय होता 1, 50, 100 अन् 150व्या सामन्याचा निकाल?