पैशाच्या आर्थिक समस्येला सामोरे जाणाऱ्या आयर्लंड क्रिकेट बोर्डाने 2020 च्या आगामी दौऱ्यासाठी (एफटीपी) बदल करत अफगाणिस्तानविरुद्धच्या 5 सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका रद्द केली आहे.
बांगलादेशविरूद्ध कसोटी सामन्याला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात बदलण्यात आले. जून 2017 मध्ये आयर्लंडला कसोटी संघाचा दर्जा देण्यात आला होता.
क्रिकेट आयर्लंडचे मुख्य कार्यकारी वॉरेन डेट्रॉम म्हणाले की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पूर्ण सदस्य झाल्यानंतर मंडळाची आर्थिक स्थिती अपेक्षेइतके सुधारली नाही.
डेट्रॉम म्हणाले, आम्ही कसोटी क्रिकेटकडे पाहण्याच्या दृष्टीने अतिशय सावध आहोत आणि हे समजून घेतो की खेळाच्या दीर्घ स्वरुपात स्पर्धात्मक संघ तयार करण्यासाठी दीर्घकालीन योजना आवश्यक आहे.
नियमितपणे कसोटी खेळण्यापूर्वी स्वत: ला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आम्हाला पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूकीची गरज आहे.
ते म्हणाले, ‘दुर्दैवाने या आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला पुढच्या वर्षी घरगुती कसोटी सामना कमी करण्यास प्रवृत्त केले. ही एका सामन्याची मालिका असून ती कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नाही.





