---Advertisement---

लॉर्ड्स कसोटी । यजमान इंग्लंडकडून आयर्लंड पराभूत, तिसऱ्याच दिवशी सामना निकाली

On: शनिवार, जून 3, 2023 11:40 PM
England Test squad
---Advertisement---

इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील कसोटी सामना तिसऱ्याच दिवसी निकाली निघाला. ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना शनिवारी (3 जून) इंग्लंडने 10 विकेट्स राखून नावावर केला. आयर्लंड संघा एका डावाच्या अंतराने पराभूत होणार, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, दुसऱ्या डावात मार्क अडायर आणि ऍन्डी मॅकब्रिन यांनी मोठी खेळी केल्यानंतर आयर्लंडने हा पराभव एक डावाच्या अंतराने न स्वीकारता 10 विकेट्सने स्वीकारला.

इंग्लंडला ही लॉर्ड्स कसोटी जिंकण्यासाठी शेवटच्या डावात अवघ्या 11 धावांचे लक्ष्य मिळाले होते. इंग्लंडने एकही विकेट न गमावता म्हणजेच 10 विकेट्स राखून हा सामना नावावर केला. तत्पूर्वी आपल्या पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांना जबरदस्त खेळी केल्याने हा विजय एवढा सोपा होऊ शकला. पहिल्या डावात इंग्लंडने अवघ्या 4 विकेट्सच्या नुकसानावर 524 धावा केल्या होत्या. यात ओली पॉप (Ollie Pope ) याने 205, तर बेन डुकेत (Ben Duckett) याने 182 धावांची सर्वोत्तम खेळी केली. ऑली पॉपला या प्रदर्शनामुळे सामनावीर पुरस्कार देखील मिळाला.

दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आयर्लंडने आपल्या दुसऱ्या डावात 3 बाद 97 धावा केल्या होत्या. इंग्लंड संघ त्यावेळी मोठ्या आघाडीवर होता. हॅरी टेक्टर 33*, तर लॉर्कन टकर 21* धावांसह खेळपट्टीवर कायम होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवसी आयर्लंडला पहिला झटका बसला टकरच्या रूपात, ज्याने 44 धावा करून विकेट गमावली. त्यानंतरची विकेट हॅरी टेक्टरने 51 धावा करून गमावली. आयर्लंड संघ या सामन्यात एका डावाच्या अंतराने पराभूत होणार, असे बहुतांश चाहत्यांना वाटत होते. पण मार्क अडायर (Mark Adair) आणि ऍन्डी मॅकब्रिन (Andy McBrien) यांनी अनुक्रमे 88 आणि 86* धावांची खेळी केली.

या दोघांनी दिलेल्या योगदानामुळेच आयर्लंड संघ इंग्लंडवर 11 धावांनी आघाडी मिळवून शकला आणि सामना चौथ्या डावापर्यंत खेळला गेला. इंग्लंडसाठी या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या जोश टंग यानेही कमाल दाखवली. पदार्पणाच्या सामन्यातील दुसऱ्या डावात टंगने 21 षटकांमध्ये 66 धावा खर्च करत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. यात दोन षटके त्याने निर्धाव देखील टाकली. (Ireland lost to England by 10 wickets in Lord’s Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या  –
‘टेस्ट क्रिकेटमध्ये खूप लवकर गुडघे टेकले’, माजी दिग्गजाची हार्दिक पंड्याविषयी मोठी प्रतिक्रिया
‘खिलाडी निकले हिरे की खान से’, प्रीमिअर हँडबॉल लीगसाठी महाराष्ट्र आयर्नमेनचे संघगीत लाँच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---