भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर तर दुसरा संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. आयर्लंडच्या दौऱ्यात दोन टी२० सामने खेळले जाणार आहेत. या टी२० मालिकेसाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारताचे नेतृत्व करणार आहे. भारताच्या कोणत्या दौऱ्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हजेरी लावणार याबद्दल चर्चा सुरू आहेत. त्यातच गांगुली हे भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना पाहणार असे म्हटले जात होते. याविषयीचे शंकानिरसन झाले असून ते कोणता सामना पाहणार हे निश्चित झाले आहे.
गांगुली हे डबलिन येथील टी२० सामना पाहण्यासाठी आयर्लंडला जाणार हे ठरले आहे. या दौऱ्यात भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांची निवड केली आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) हे इंग्लंडमध्ये भारताच्या प्रशिक्षणात व्यस्त आहेत. तेथे भारत कसोटी सामना झाल्यावर तीन सामन्यांची टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहेत.
भारत आयर्लंड विरुद्धचा पहिला टी२० सामना २६ जून आणि दुसरा टी२० सामना २८ जूनला खेळणार आहेत. हे दोन्ही सामने डबलिन येथे खेळले जाणार आहे.
भारतीय संघ २०१८नंतर प्रथमच आयर्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना त्यांची कामगिरी सिद्ध करण्याची संधी आहे. या दौऱ्यात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला संधी देण्यात आली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार खेळी करत संघात जागा कायम केली. या दौऱ्यात त्याने पुन्हा एकदा उल्लेखनीय खेळी केल्या तर जवळपास त्याचे टी२० विश्वचषकातील स्थान निश्चित आहे. राहुल त्रिपाठी याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले तर त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण असणार आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे;
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आमंत्रण असूनही रमिझ राजा याने आयपीएल फायनल साठी उपस्थित राहणे टाळले?, कारण झाले स्पष्ट
टीम इंडियाला दिलासा, विराट-रोहितचा घाम काढणारा इंग्लिश गोलंदाज वनडे, टी२० मालिकेला मुकणार?