आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात नेदरलँड्स संघाने १ धावांनी विजय मिळवला. परंतु या सामन्यात आयर्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना एक फलंदाज आगळ्या वेगळ्या प्रकारे बाद झाल्याचे पहायला मिळाले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यातील दुसऱ्या डावात, शाकीब जुल्फिकारने ३३ व्या षटकातील पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळला आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. शाकिबने नॉन स्ट्राइकच्या दिशेने धाव घ्यायला सुरुवात केली. त्याला असे वाटले की, क्षेत्ररक्षक त्याच्या दिशेने थ्रो करणार नाही. परंतु त्याचा अंदाज चुकीचा ठरला.
क्षेत्ररक्षक एंडी मॅकब्राइनने शाकिबच्या दिशेने थ्रो करत त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले. जेव्हा तो धावबाद झाला तेव्हा तो क्रिजच्या अगदी जवळच होता. आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
🎯#NEDvIRE | https://t.co/tYzBx2WNpUpic.twitter.com/i5QGWj9oNz
— ICC (@ICC) June 2, 2021
या सामन्यात नेदरलँड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नेदरलँड्स संघाकडून टीम वान डर गुगटेनने ५३ चेंडूत ४९ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावले होते. तसेच लोगन वान बीकने २९ धावांचे योगदान दिले होते. नेदरलँड संघाला ५० षटकाअखेर सर्वबाद १९५ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आयर्लंड संघाकडून पॉल स्टर्लिंगने ११२ चेंडूत सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ८ चौकार लगावले होते. तसेच सिमी सिंग याने देखील ६९ चेंडूत ४५ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. तरी देखील आयर्लंड संघाला या सामन्यात एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेदरलँड्स संघाकडून गोलंदाजी करताना पिटर सिलर याने ९ षटकात २७ धावा खर्च करत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर लोगन वान बीकने १० षटकात ४४ धावा खर्च करत २ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडमध्ये कमी सराव मिळाल्याचा परिणाम होणार? ‘कर्णधार’ कोहलीने दिले ‘हे’ उत्तर
कॅरेबियन बेटावर जन्मलेला पण भारताकडून खेळताना ‘चपळ क्षेत्ररक्षक’ म्हणून नावारुपाला आलेला रॉबिन सिंग
एमएस धोनीने आजपर्यंत केले आहे सर्व टी२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व, पाहा कशी राहिली संघाची कामगिरी