या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग, ऍरोन फिंच यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या आयुष्यात देखील नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. आता वर्षाच्या शेवटी, आणखी एक गोड बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. ज्याची माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्याच्या पत्नीने मंगळवारी( २८ डिसेंबर) मुलाला जन्म दिला आहे. ज्याचे नाव त्यांनी सुलेमान खान असे ठेवले आहे. इरफान पठाणने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर आपली मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, “पत्नी सफा आणि मुलगा ठीक आहे..” असे लिहिले आहे.
इरफान पठाणच्या पहिल्या मुलाचे नाव इम्रान खान पठाण असे आहे. इरफानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने गेली अनेक वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने समालोचन क्षेत्रात देखील आपली छाप सोडली आहे.
भारतीय संघासाठी त्याने २९ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने अप्रतिम कामगिरी करत १०० गडी बाद केले होते. तर वनडे कारकिर्दीत त्याने १७३ गडी बाद केले आहेत. तसेच टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झालं तर, त्याने २८ गडी बाद केले होते.(Irfan Pathan and his wife have been blessed with a baby boy)
तसेच गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये देखील त्याने आपली ठसा उमटवला होता. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३१.५८ च्या सरासरीने ११०५ धावा केल्या होत्या. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने १५४४ आणि टी२० क्रिकेटमध्ये त्याने १७२ धावा केल्या होत्या. त्याने २००७ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने पहिलेवहिले जेतेपद पटकावलेले.
महत्वाच्या बातम्या :
विश्वचषक आणि ऍशेस जिंकवूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया हटविणार कोच लँगरला? वाचा सविस्तर
युवा अफगाण फलंदाजाने केली भारताच्या ‘दादा’ गोलंदाजांची धुलाई; एकाच षटकात बदलून टाकले आकडे
हे नक्की पाहा;