---Advertisement---

“सुरुवातीपासूनच वापर करा आणि फेका अशी वृत्ती”, इरफानचे ट्विट चर्चेत

On: शनिवार, नोव्हेंबर 25, 2023 5:09 PM
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. विश्वचषकादरम्यान पाकिस्तान संघाला ट्रोल करणारे त्याचे ट्विट वादग्रस्त ठरलेले. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. इरफान याने नुकतेच ट्विट केले असून, यामध्ये तो भावनिक झालेला दिसला‌.

इरफानने एक ट्विट करत म्हटले,

https://twitter.com/IrfanPathan/status/1728321868392972636?t=DtORLlfK7Xj2UIPliuT7dg&s=19

‘वापर करून घ्या आणि फेकून द्या असे सुरुवातीपासूनच वैशिष्ट्य आहे.’

त्याने हे ट्विट का केले याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. चाहत्यांनी याचा अंदाज बांधत हे भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्यासाठी असल्याचे म्हटले. तर काहींनी गुजरात टायटन्स यांच्यासाठी हे ट्विट असल्याचे नमूद केले.

हार्दिक याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात इरफान पठाण याने त्याला मोठी मदत केली होती. मात्र, हार्दिक त्याबद्दल फारसा बोलताना दिसत नाही. तसेच, मागील वर्षीच्या एका मुलाखतीत हार्दिक याने मुंबई इंडियन्सपेक्षा चेन्नई सुपर किंग्स संघातील वातावरण चांगले असल्याचे बोलले होते. विशेष म्हणजे हार्दिक मुंबईसाठी तब्बल 7 वर्ष खेळला होता.

‌सध्या हार्दिक पंड्या हा आगामी आयपीएल हंगामासाठी गुजरात टायटन्स संघाची साथ सोडून मुंबई इंडियन्सकडे जात असल्याचे वृत्त आहे. याबद्दल त्याला मोठी रक्कम तसेच काही ब्रँड जाहिरातीसाठी देण्यात येणार आहेत. गुजरात संघाने त्याला प्रथम आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली होती. दोन हंगामात त्याने संघाचे नेतृत्व करताना पहिल्या हंगामात विजेचेपद मिळवले होते तर दुसऱ्या हंगामात संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

(Irfan Pathan Cryptic Tweet After Hardik Pandya Mumbai Indians Trade)

महत्वाच्या बातम्या – 
WPL 2024: लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
रोहितचा Future Plan आला समोर, विराटबद्दलही मिळाली माहिती; वाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याशी संबंधित अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---