मुंबई । भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी 1983 साली भारताला पहिल्यांदा वनडे विश्वचषक जिंकून दिला. या विजयानंतर भारतात क्रिकेटमधले वातावरण बदलून गेले. आपल्या नेतृत्वात भारताला पहिल्यांदा चॅम्पियन बनवणारे कपिल देव हे लाखो युवकांच्या गळ्यातले ताईत बनले. आजही त्यांची खेळी अनेकांना प्रेरित करते. दरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने कपिल देव यांचे कौतुक केले आहे.
इरफान पठाण म्हणाला की, ‘माझा जन्म 1984 मध्ये झाला होता. कपिल देव लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभे होते. विश्वचषक ट्रॉफी घेत असतानाचे चित्र मला आठवते. माझ्या कारकीर्दीत वसीम अक्रमने मला खूप प्रेरित केले. जेव्हा मी मोठा झालो होतो तेव्हा कपिल देवपेक्षा मोठा कोणी खेळाडू नव्हता.’
तो इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला की, ‘ते संघाचे कर्णधार होते. फलंदाजी करुन सामने जिंकून देत. चेंडूही स्विंग करायचे. जर कोणाला भारतात अष्टपैलू व्हायचे असेल कपिल देव प्रेरणदायी असतील. मी त्यांचे बरेचसे सामने पाहिले नाही आहेत त्या दिवसांत बरीच सामने लाईव्ह दाखविले जात नव्हते. जरी ते असले तरी आमच्याकडे घरी टीव्ही नसल्याने आम्ही नेहमीच पाहू शकत नव्हतो. आम्हाला आमच्या शेजार्यांकडे जावे लागायचे.’
पठाण म्हणाला, ‘लहान असताना आम्ही एकमेकांना सांगायचो की आज मी तुम्हाला कपिल देवसारख्या मागे धावताना झेल कसा घेतला जातो ते दाखवितो. आम्ही फलंदाजी करताना त्याच्या शॉट्सचे अनुकरण करायचो.’
इरफानने कपिल यांच्याबरोबरील आठवणींबद्दलही सांगितले. पठाण पुढे म्हणाला, ‘माझी त्यांबरोबरील सर्वोत्कृष्ट आठवणी स्टार स्पोर्ट्स स्टुडिओमधील आहेत. न थांबता बोलणे, जिलेबी खाणे… ते नेहमी काहीतरी खायला आणतात. मी स्वत: ला भाग्यवान समजतो की मी माझ्या रोल मॉडेलबरोबर काम करत आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी मला दिल्ली येथील त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते आणि आम्ही बर्याच वेळे गप्पा मारल्या. एवढे मोठे असूनही ते खूप नम्र आहे.”
इरफानने याच वर्षाच्या सुरुवातील निवृत्ती घेतली आहे. इरफानने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३०१ विकेट्सही घेतल्या आहेत.