---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध इरफान पठाणने निवडली भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’; इशान किशन, आर अश्विनला दिला डच्चू

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 11:06 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकातील आपले आभियान सुरू करण्यापूर्वी भारतीय संघाने सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत दोन सराव सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडवर सात गडी राखून मात केली. त्याचबरोबर, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सने दणदणीत पराभव केला.

एकूणच, सराव सामन्यांमध्ये भारतीय संघाने ज्याप्रकारे कामगिरी केली. त्यावरून असे दिसून येते की, भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मोठी तयारी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या २४ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. हा सामना डोळ्यासमोर ठेवून भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्ध भारताचा प्लेइंग इलेव्हन संघ निवडला आहे.

इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुलची त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून निवड केली आहे. त्याचवेळी अप्रतिम फॉर्ममध्ये असलेल्या ईशान किशनला इरफानने आपल्या यादीतून वगळले आहे. यानंतर इरफानने विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर संघांत स्थान दिले आहे. तर सूर्यकुमार यादव, रिषभ पंत यांना त्याने मधल्या फळीत ठेवले आहे.

याशिवाय, पठाणने अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्याची निवड केली आहे आणि त्याच्यासोबत त्याने रवींद्र जडेजालाही संघात समाविष्ट केले आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याने समावेश केला आहे, तर फिरकी गोलंदाज म्हणून वरुण चक्रवर्तीवर त्याने विश्वास ठेवला आहे. सराव सामन्यांमध्ये दमदार गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनला इरफानने प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे.

टी२० विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध नेहमीच वरचष्मा राहिला आहे. टी२० विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही देशांदरम्यान पाच सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारताने पराभव स्वीकारलेला नाही. यादरम्यान, एका सामन्यात दोन्ही संघांची बरोबरी झाली होती, तेव्हा या सामन्याचा निकाल बॉल आउटने लागला होता. हा सामना भारताने जिंकला होता.

या व्यतिरिक्त, भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये सात वेळा आमनेसामने आले आणि प्रत्येक वेळी भारतीय संघ सामना जिंकण्यात यशस्वी झाला आहे. एकूणच, पाकिस्तान भारताविरुद्ध विश्वचषक सामन्यांमध्ये आपल्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहे.

इरफान पठाणची प्लेइंग इलेव्हन-
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या बातम्या – 

जवळचा मित्र विराटच्या सल्ल्याने मॅक्सेवलचा घात, धोकादायक अष्टपैलूला चाहरने ‘असे’ केले बाद

वनिंदू हसरंगाचे ११ चेंडू सीमापार करत तुफानी अर्धशतक; आयर्लंडला नमवत श्रीलंकेचा सुपर १२ मध्ये थाटात प्रवेश

बीसीसीआय होणार मालामाल! आयपीएलचे प्रसारण हक्क विकून मिळवणार तब्बल ‘इतके’ कोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---