---Advertisement---

‘जर ते जिंकले तर हृदय तुटतील, आपण जिंकलो तर टीव्ही’, इरफानने उडवली पाकिस्तानी चाहत्यांची खिल्ली

On: रविवार, ऑक्टोबर 24, 2021 6:07 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकामध्ये रविवारपासून (२४ ऑक्टोबर) भारत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होईल. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी चाहत्यासोबत आजी माजी खेळाडू देखील व्यक्त होत आहे.

माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने टी-२० विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची खिल्ली उडवली आहे. भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांचे टीव्ही फोडण्याचे फोटो अनेकदा व्हायरल होतात आणि इरफानने यावर आपला निशाणा साधला आहे.

इरफानने रविवारी (२४ ऑक्टोबर) ट्विट केले, ‘जर ते जिंकले तर हृदय तुटतील, आणि आपण जिंकलो तर टीव्ही.’ इरफान म्हणायचे होते की, पाकिस्तान जिंकला तर भारतीयांची मनं तुटतील आणि भारत जिंकला तर पाकिस्तानी चाहते आपले टीव्ही फोडतील.

टी-२० विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान पाच वेळा आमनेसामने आले आहेत. प्रत्येक वेळी निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागला आहे. यावेळीही भारताचा संघ खूप मजबूत दिसत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानची फलंदाजी मुख्यतः त्याचा कर्णधार बाबर आझमवर अवलंबून असेल.

इरफान २००७ मध्ये टी -२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. त्याने २० ऑक्टोबरला ट्विट करून हार्दिक पंड्याकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्याने लिहिले, ‘हार्दिक सध्या पूर्वीसारखा खेळत नाही पण आता विश्वचषक आला आहे आणि आशा आहे की तो चांगली कामगिरी करेल. नाही तर मोठ्या सामन्यांमध्ये भारतासाठी काही गोष्टी निराशाजनक होऊ शकतात.

विश्वचषक सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध नेहमीच वरचष्मा राहिला आहे. १९९२ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून सुरू झालेला विजयाची परंपरा आजही कायम आहे. एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत ७ वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर टी -२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला ५ वेळा हरवले आहे. म्हणजेच एकूणच भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध १२ वेळा विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारत-पाक सामन्यापूर्वी झोमॅटोने साधला मौका; पाकिस्तानी खेळाडूंना दिली ‘ही’ ऑफर

‘शुद्धीवर आलोय, तेव्हापासून हारतानाच पाहातोय, आता तरी जिंका’, पाकिस्तानच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या गमतीशीर कमेंट्स

‘पाकिस्तान जिंकावा, पण धोनीवर माझे खूप प्रेम आहे’, भारत-पाक सामन्यापूर्वी ‘शिकागो चाचा’ फसले द्विधा मनस्थितीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---