---Advertisement---

आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणारा फलंदाज इंग्लंडमध्ये ठरला फ्लॉप, 4 डावांत केल्या फक्त 27 धावा

On: सोमवार, जुलै 7, 2025 6:17 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये मुंबईचा 17 वर्षांचा स्टार आयुष म्हात्रेने (Aayush Mhatre) चेन्नई सुपर किंग्जकडून चांगली कामगिरी केली. तिथे त्याने आपल्या फलंदाजीने जबरदस्त कामगिरी करत सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. आयपीएलमधील प्रदर्शनामुळेच आयुषला इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार निवडण्यात आला होता. टीम इंडियाने (Team india) या मालिकेत चांगली कामगिरी केली, पण कर्णधार आयुष म्हात्रेच्या बॅटमधून मात्र फारशा धावा निघाल्या नाहीत. इंग्लंडच्या मैदानावर पोहोचताच त्याचा फॉर्म पूर्णपणे गायब झाला.

आयुष म्हात्रे (Aayush Mhatre) पूर्णपणे अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्ध पहिल्या यूथ वनडे सामन्यात आयुषने 21 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात तर तो शून्यावर बाद झाला. तिसऱ्या सामन्यात आयुष खेळलाच नाही, पण चौथ्या सामन्यात परत आल्यावरही फक्त 5 धावा करून परतला. यूथ वनडे मालिकेच्या अखेरच्या सामन्यातही कर्णधार म्हात्रे फक्त 1 धाव करू शकला. टीम इंडियाने 5 सामन्यांची मालिका आधीच 3-1 ने जिंकली होती, पण अखेरचा सामना जिंकून अंडर-19 संघ आत्मविश्वास घेऊन कसोटी मालिका खेळू इच्छितो आहे.

चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) आयपीएल 2025 मध्ये आयुषने 7 सामने खेळले होते. यात त्याने 34.29 च्या सरासरीने 240 धावा केल्या. त्याने एका अर्धशतकासह 188.98 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली होती. आता आयुषकडे कसोटी मालिकेत चांगलं प्रदर्शन करून पुनरागमन करण्याची मोठी संधी आहे. फक्त 17 वर्षांचा असतानाही त्याने वेगळा प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये त्याच्या अपयशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्विंग गोलंदाजीविरुद्ध अजून आपला खेळ सुधारण्याची आयुषला गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---