---Advertisement---

PSL चांगले की IPL? इंग्लिश क्रिकेटरच्या उत्तराने पाकिस्तानी मीडियाची बोलती बंद!

On: बुधवार, एप्रिल 16, 2025 10:21 PM
---Advertisement---

सध्या भारतात खेळल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलसोबतच, पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएल देखील शेजारील देश पाकिस्तानमध्ये खेळले जात आहे. या लीगमध्ये अनेक परदेशी खेळाडूही आले आहेत. या लीग दरम्यान, पाकिस्तानी मीडियाने इंग्लंडचा स्टार खेळाडू सॅम बिलिंग्जला (Sam Billings) प्रश्न विचारला की, आयपीएल की पीएसएल कोणती लीग चांगली आहे. बिलिंग्जने या प्रश्नाचे उत्तर जोरदार दिले.

सॅम बिलिंग्जने पाकिस्तानी मीडियाला जोरदार प्रत्युत्तर देत म्हटले की, “तुम्ही माझ्याकडून काही वादग्रस्त विधानाची अपेक्षा करत आहात. तरीही, मी तुम्हाला सांगतो की, जगात आयपीएलपेक्षा चांगली दुसरी कोणतीही लीग नाही. जगातील प्रत्येक लीग आयपीएलपेक्षा खूप मागे आहे. आम्ही इंग्लंडमध्ये आयपीएलशी स्पर्धा करू शकेल अशी लीग तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. बिग बॅश ऑस्ट्रेलियामध्येही खेळला जातो, पण आयपीएलसमोर ते काहीच नाही.”

सॅम बिलिंग्ज पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळत आहे. खरंतर, पाकिस्तानी मीडियाला अपेक्षा होती की सॅम बिलिंग्ज पाकिस्तान सुपर लीगला सर्वोत्तम घोषित करेल आणि या लीगची खूप प्रशंसा करेल पण उलट, त्याने आयपीएलची खूप प्रशंसा केली आणि त्यांना गप्प केले.

सॅम बिलिंग्ज देखील आयपीएल खेळला आहे. पण, 2025च्या हंगामात त्याला कोणत्याही संघाने निवडले नाही. तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 30 सामने खेळले. यामध्ये त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान त्याच्या बॅटमधून 503 निघाल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---