भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला भेटला होता. त्याचा फोटो त्याने इंस्टाग्रामला शेअर केला आहे.
अजय देवगण आणि कृणाल पंड्या यांची चेहरापट्टी काहीशी सारखी आहे. त्यामुळे या फोटोला कृणालने कॅप्शन दिले आहे की, ‘डोपेलगॅन्गलर (डाव्या बाजूला) उभा आहे: अजय देवगण आणि कृणाल पंड्या.’
https://www.instagram.com/p/BlLIO_Xggro/?hl=en&taken-by=krunalpandya_official
डोपेलगॅन्गलर म्हणजे सारखे दिसणारे. या दोघांच्या सारख्या चेहरापट्टीमुळे हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे.
कृणालच्या या फोटोवर त्याचा मुंबई इंडियन्स संघातील संघसहकारी आणि विंडिजचा आक्रमक फलंदाज किरॉन पोलार्डनेही मजेशीर कमेंट केली आहे. पोलार्डने गमतीने कमेंट करताना विचारले आहे की, ‘हे खरे वडील आहेत का?’
यावर कृणालने उत्तर देताना म्हटले आहे की ‘नाही सर, तूला सगळं माहिती आहे माझ्या वडीलांबद्दल. त्यामुळे मला तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचे नाही.’
कृणालची नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील टी20 मालिकेसाठी दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदर ऐवजी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र त्याला एकाही सामन्यात 11 जणांच्या संघात स्थान मिळले नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–स्मिथ-वार्नर जोडीला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा जोरदार धक्का
–एकवेळ टीम इंडियाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेला खेळाडू भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक
–कारकिर्दीत पहिलाच चौकार मारणाऱ्या चहलने असे केले सेलिब्रेशन, अन्य खेळाडूंना हसू आवरेना