इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामात चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकू शकला. सीएसकेच्या विजयात शेवटच्या चेंडूवर चौकार मारणाऱ्या रविंद्र जडेजाची भूमिका महत्वाची राहिली. जडेजाने संपूर्ण हंगामातील प्रदर्शन देखील जबरदस्त राहिले होते. कर्णधार एमएस धोनी याचे योगदान देखील कोणीच नाकारू शकत नाही. असे असले तरी, धोनी आणि जडेजा यांच्यात काहीतरी बिनसल्याचे बोलले जात आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांना याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
दरम्यान, आयपीएल 2022 हंगामापासूनच एमएस धोनी (MS Dhoni) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यात काहीतरी बिनसल्याचे बोलले जात आहे. मागच्या वर्षी जडेजा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला होता. पण संघाच्या सुमार प्रदर्शनामुळे हंगामाच्या मध्यात त्याच्याकडून कर्णधारपद माघारी घेतले केले आणि धोनी पुन्हा संघाचे नेतृत्व करताना दिसू लागला. आयपीएळ 2022 संपल्यानंतर जडेजा सीएसकेची साथ सोडणार अशाही चर्चा होत्या, स्वतः जेडजाने देखील सोशल मीडियावर सीएशकेशी संबंधित सर्व आठवणी पुसून टाकल्या होत्या.
असे असले तरी, यावर्षी आयपीएच्या 16व्या हंगामापूर्वी सीएसके संघ व्यवस्थापनाने कसेबसे त्याचे मन वळवले, असे सांगितले जात आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये जडेजाच्या काही पोस्ट आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले होते. अनेकांच्या मते जडेजा आणि धोनी यांच्यात यावर्षी आयपीएलदरम्यान मोठा वाद झाला होता. पण सीएशकेचे सीईओ काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) याविषयी म्हणाले की, “जडेजाच्या मनात धोनीविषयी खूप सन्मान आहे. दोघांमध्ये कुठलाच वाद नाहीये. जडेजाने संपूर्ण आयपीएल हंगामात चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजीतही वेळोवेळी त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने कधीच धोनीविषयी तक्रार केली नाहीये.”
दरम्यान, धोनी आणि जडेजाचा वाद मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत असला, तर आयपीएल 2023चे विजेतेपद जिंकल्यानंतर जडेजाने सर्वात पहिली मिठी धोनीलाच मारली होती. तसेच ट्रॉफी उंचावताना धोनीने जडेजाला स्टेजवर देखील बोलावले होते. (Is there really a feud between MS Dhoni and Ravindra Jadeja? CSK CEO Kashi Vishwanath informed about this)
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला पहिल्याच घासाला खडा! आयसीसीची मोठी कारवाई; नव्या डब्ल्यूटीसी हंगामातही नुकसान
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना डिवचणे ‘बार्मी आर्मी’ला पडले महागात! वॉर्नरने ‘विराट स्टाईल’ने केली बोलती बंद!