पुणे : भांडारकर रोड येथील विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने ‘सायमलटेनिअस’ बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या या प्रदर्शनीय सामन्यात सहभागी नवोदित ६० खेळाडू एकाच वेळी वूमन ग्रँडमास्टर ईशा करवडेसह इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकर एकाच वेळी खेळले. या वेळी ईशा आणि अभिषेकने सहभागी खेळाडूंना बुद्धिबळाचा धडे दिले.
ही स्पर्धा भांडारकर रस्त्यावरील साने डेअरी चौक येथे विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टच्या मंडपात झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, कार्याध्यक्ष सुनील पांडे,सरचिटणीस चैतन्य रड्डी, वरुण जकातदार, भूषण मोरे, अभिजीत मोडक, समीर हलंदे, योगेश जोगळेकर उपस्थित होते.
स्पर्धेत ६० पैकी दोघांनी डाव बरोबरीत सोडविले. यात मार्मिक शाह आणि सुयोग वाडके यांनाच बरोबरी साधता आली. बाकी सर्वांनाच ईशा आणि अभिषेकने पराभूत केले. या वेळी ईशा आणि अभिषेक एकाच वेळी सर्वांशी खेळले. त्यात त्यांनी सहभागी सर्वांचे कौतुक केले. त्या वेळी बुद्धिबळात आणखी प्रगती करण्याचा सल्ला दिला. सातत्याने खेळत राहा, असेही ते म्हणाले. जेवढ्या स्पर्धा खेळाल, तेवढ्या नवीन गोष्टी शिकाल, असेही ते म्हणाले. या वेळी पंच म्हणून राजेंद्र शिदोरे आणि दीप्ती शिदोरे यांनी काम पाहिले.
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंड संघाचा स्पेशल विजय, 15 वर्षांमध्ये बांगलादेशमध्ये केली ‘ही’ मोठी कामगिरी
अभिमानास्पद! चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताने घोडेस्वारीत जिंकलं गोल्ड मेडल