गुवाहटी। खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या सर्व तिरदांजांनी कमालीचे सातत्य राखून बाद फेरीत प्रवेश मिळविला. मुला-मुलींच्या १७ आणि २१ वर्षांखालील गटातून महाराष्ट्राच्या तिरंदांजांनी आपली छाप पाडली. थंड हवामानातही त्यांनी आपले तीर भरकटणार नाहीत, याची काळजी घेतली. उद्या बाद फेरीला सुरवात होईल तेव्हा महाराष्ट्राचे तिरंदाज अधिकाधिक आपल्या पदकाच्या लक्ष्याच्या जवळ पोहोचतील.
मुलींच्या १७ वर्षांखालील गटातून ईशा पवार हिला सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे. तसेच रिकर्व्हमध्ये ऑलिंपिक पात्रतेचे स्वप्न बाळगणारी २१ वर्षांखालील गटातील टिशा संचेती देखील आपले वर्चस्व राखून आहे. या दोघी आपापल्या गटातून पात्र ठरल्या आहेत.
बाद फेरीसाठी पात्र ठरलेले तिरंदाज
१) १७ वर्षांखालील (रिकर्व्ह) मुले – यमनकुमार (६७६), पार्थ साळुंके (६६८), विशाल चंगमयी (६५८), आर्यन ढगे (६३४), मुली – वैदेही राठोड (६३५). कंपाउंड (मुले) – प्रथमेश जावकर (६८२), स्वामी दळवी (६८९), करण सलोक (६७६), राघव पांडे (६७१), मुली – ईशा पवार (६८५).
२) २१ वर्षांखालील (रिकर्व्ह) मुले – मयूर रोकडे (६६४), सुखमणी बाबरेकर (६५८), सचिन वेदवान (६५५), मुली – टिशा संचेती ((६३६), साक्षी तोटे (६२८), कोमल डवरे (६१०). कंपाऊंड (मुले) – वेदांत वानखेडे (६९४), तुषार फडतरे (६८८), सौमित्र घोष (६८०), मुली – मधुरा धामणगांवकर (६८६).