---Advertisement---

भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत या दोन खेळाडूंमधील द्वंद्व मजेदार असेल – ऍरॉन फिंच

On: शनिवार, जानेवारी 11, 2020 2:41 PM
---Advertisement---

14 जानेवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 3 सामन्यांची वनडे (ODI Series) मालिका सुरु होणार आहे. यातील पहिला सामना (1st ODI Match) मुंबई (Mumbai) येथे पार पडणार आहे. या मालिकेसाठी काल ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे.

या मालिकेपूर्वी शुक्रवारी (10 जानेवारी) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने (Aaron Finch)  भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशाने (Marnus Labuschagne) या दोन खेळाडूंचे कौतुक केले आहे. या दोन खेळाडूंमधील द्वंद्व पहाणे रोमांचक असेल असेही फिंच म्हणाला. 

“हो, त्यांच्यातील (लॅब्यूशाने आणि बुमराह) द्वंद्व शानदार असेल. लॅब्यूशानेची देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी चांगली आहे. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक खेळपट्टीवर फलंदाजी केली आहे. त्यामुळे हे भारतात क्रिकेट खेळल्याप्रमाणे आहे. आशा आहे की लॅब्यूशाने चांगली कामगिरी करेल,” असे पत्रकारांशी बोलताना फिंच म्हणाला.

त्याचबरोबर बुमराहबद्दल बोलताना फिंच म्हणाला की, “जेव्हा तुम्ही बुमराहविरुद्ध खेळत नसता, तेव्हा त्याची गोलंदाजी पाहणे हे खूप रोमांचक असते. जेवढे जास्त वेळ तुम्ही त्याला गोलंदाजी करताना पहाल तेवढे तुम्ही त्याच्या विरुद्ध चांगली कामगिरी करणे शिकाल.”

“प्रत्येक व्यक्तीची आपली वेगळी योजना असते. तुम्हाला मानसिकरित्या आव्हानासाठी सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याची गरज असते.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---