बीसीसीआयने नुकतेच 2023-24 साठी केंद्रीय कराराची यादी जाहीर केली आहे. तर या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोघांनीही बीसीसीआयची आदेश डावलून रणजी ट्रॉफी खेळण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे करारातून वगळून एकप्रकारे त्यांच्यावर कारवाई केल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
याबरोबरच बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली. यातून अपेक्षेप्रमाणे इशान किशन आणि श्रेयस अय्यरचे नाव वगण्यात आलं आहे. तसेच ग्रेड A+ मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर हे सर्व खेळाडू भारताकडून सर्व फॉरमॅटममध्ये खेळतात. तर ग्रेड A मध्ये रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच बुधवारी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचा केंद्रीय करार जाहीर केला होता. या कराराच्या यादीत इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही खेळाडूंबाबत चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही फलंदाजांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काहीजण बीसीसीआयच्या या निर्णयाला चुकीचे म्हणत आहेत, तर काहीजण याला समर्थन देत आहेत. यादरम्यान माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील अय्यर आणि इशान कराराबाहेर असल्याबद्दल ट्विट केले आहे.
BCCI कडून वार्षिक करार जाहीर, मिळाली या खेळाडूंना संधी नावे पुढीलप्रमाणे –
A+ श्रेणी – रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
A श्रेणी – आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.
ब श्रेणी – सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
क श्रेणी – रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.
दरम्यान, बीसीसीआयने या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टसोबत एक नवीन नियमही केला आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार, वार्षिक करार पाहिजे असल्यास संबंधित खेळाडूने किमान 3 कसोटी, 8 वनडे किंवा 10 टी 20 या तिघांपैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता केलेली असायला हवी. ही अट पूर्ण केलेली असल्यास त्या खेळाडूची बीसीसीआयकडून सी ग्रेडमध्ये समावेश केला जाईल. बीसीसीआय खेळाडूंची वार्षिक करारासाठी 4 गटात वर्गवारी करते. त्यानुसार ए प्लस, ए, बी आणि सी अशा श्रेणी आहेत. त्यानुसार खेळाडूंना एका वर्षासाठी अनुक्रमे 7, 5, 3 आणि 1 कोटी रुपये दिले जात असतात.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : जेम्स अँडरसन या दिग्गज भारतीय गोलंदाजाला मानतो गुरू; म्हणाला, ‘रिव्हर्स स्विंगची कला…
- BCCI कडून वार्षिक करार जाहीर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनचं काय?