शनिवारी (दि. 10 डिसेंबर) बांगलादेश विरुद्ध भारत संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना खेळला जात आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करणाऱ्या भारतासाठी हा ‘करो वा मरो’ सामना आहे. झहुर अहमद चौधरी स्टेडिअम, चट्टोग्राममधील या सामन्यात युवा सलामीवीर ईशान किशन याने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने वादळी द्विशतक झळकावत आपले नाव इतिहासात नोंद केले.
???????????? ???????????????? ???????????? ???????????????????? ???????????????????????? ????????
???????????????? ???? ???????????????????????????????????????????? ???????????????????????? ???????????????????????????? ???????????????? ???????????? ????????????????.
He is the fourth Indian to do so. Take a bow, @ishankishan51 ????????#BANvIND pic.twitter.com/Mqr2EdJUJv
— BCCI (@BCCI) December 10, 2022
कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे मायदेशी परतल्यानंतर सलामीवीर म्हणून ईशान किशन याला संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करत सुरुवातीला 49 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने आपला खेळ तसाच सुरू ठेवत आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या शतकानंतर त्याचा धावांचा वेग आणखीच वाढला. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढत 126 चेंडूवर 23 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने नाबाद 200 धावा पूर्ण केल्या. वनडे सामन्यात द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरले.
वन डे क्रिकेटमध्ये भारतासाठी या आधी सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी एक तर, रोहित शर्मा याने तीन द्विशतके झळकावली आहेत.
ईशानने बाद होण्यापूर्वी 131 चेंडूचा सामना करताना 210 धावा केल्या. यामध्ये 24 चौकार व 10 षटकारांचा समावेश होता.
(Ishan Kishan Hits Double Century In ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला नडणाऱ्या पठ्ठ्याने सोडली इंग्लंडची साथ; ‘या’ देशासाठी खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट
BANvIND: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल






