सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, त्याला भारताचा मिस्टर ३६० खेळाडू का म्हटले जाते. मंगळवारी (०२ ऑगस्ट) वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात त्याने झंझावाती अर्धशतक केले. त्याच्या ताबडतोब अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ७ विकेट्सने तो सामना जिंकला आणि मालिकेत २-१ अशी आघाडीही घेतली. या सामना विजयानंतर भारताचा युवा यष्टीरक्षक इशान किशन याने सामनावीर सूर्यकुमारची मुलाखत घेतली आहे.
सूर्यकुमार (Suryakumar Yadav) आणि इशान (Ishan Kishan) हे आयपीएलमध्ये एकाच मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मॅच विनिंग खेळी खेळल्यानंतर इशानने सूर्यकुमारची मुलाखत घेताना त्याला मजेशीर प्रश्न विचारला. बीसीसीआयने (BCCI) या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सोशल केला आहे.
मुलाखतीदरम्यान इशान मजेत बोलताना सूर्यकुमारला म्हणाला की, “माझ्याकडे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याबद्दलचे आकडे मला तुझ्याकडूनच समजले आहेत. अगदी तूही याबद्दल नोटीस केले आहेस.”
“मला समजले आहे की, वहिनी (सूर्यकुमारची पत्नी) ट्रेंट ब्रिजमध्ये सामना पाहायला आल्या नव्हत्या, जिथे तू शतक केले होते. त्यानंतर त्या सर्व सामने पाहायला आल्या, परंतु तू त्या सामन्यात खास खेळ दाखवू शकला नाहीस. त्यानंतर आज वहिनी आल्या नाहीत आणि तू ७६ धावा फटकावल्यास. याबद्दल तुझे काय म्हणणे आहे. माझी इच्छा आहे की, तू तेच उत्तर द्यावे जे डगआऊटमध्ये दिले होते.”
Of special knock, learnings & an anecdote 💪 😃
𝗗𝗼 𝗡𝗼𝘁 𝗠𝗶𝘀𝘀 as @surya_14kumar shares it all in this post-match chat with @ishankishan51 after #TeamIndia's win at St. Kitts. 👌 👌 – By @28anand
Full interview 🎥 🔽 #WIvINDhttps://t.co/frYJceblLl pic.twitter.com/5QSYA1ASaJ
— BCCI (@BCCI) August 3, 2022
या प्रश्नाचे उत्तर देताना सूर्यकुमारही खोटे बोलला नाही. त्याने अगदी खरे बोलत आपली जोडीदार स्वत: स्टेडियममध्ये उपस्थित राहावी हे गरजेचे नसते, असे सांगितले आहे.
सूर्यकुमार उत्तर देत म्हणाला की, “जेव्हाही कोणी खोटे बोलतो, तेव्हा त्याचे शब्द अडखळतात. चांगली खेळी करताना मैदानावर आपल्या जोडीदाराचे असणे गरजेचे नसते. त्याहून जास्त महत्त्वाचे असते, त्या व्यक्तीने तुमच्यासोबत असणे. ती (देविशा शेट्टी) सध्या माझ्यासोबत वेस्ट इंडिजमध्ये आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. मी तर तिचे नावही टॅट्यू करून घेतले आहे, त्यामुळे ती नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ असते. ती माझ्यासोबत वेस्ट इंडिजमध्ये असल्याने त्याची ताकद मला मैदानातही मिळते.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आशिया चषकात भारतीय संघाला ‘या’ चौघांची कमतरता जाणवणार! २०१८ साली जिंकवून दिलेली ट्रॉफी
छोरियां छोरों से कम नहीं! रेणुकाने घडवला इतिहास, दुसऱ्यांदा ४ विकेट्स घेत विश्वविक्रमाला गवसणी
आता सुरू होणार मेडल्स जिंकण्यासाठीची अस्सल शर्यत, भारतासह ‘या’ ४ संघांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश