क्रिकेट सामना सुरू असताना बऱ्याचदा आपापसांत किंवा विरोधी संघातील खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते. असाच काहीसा प्रसंग भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज तबरेज शम्सी याच्या एका षटकात भारताचा सलामीवीर इशान किशन याने षटकार मारला, ज्यामुळे तबरेज इशानवर चिडला. त्यानंतर इशाननेही त्याला प्रत्युत्तर दिल्याने त्यांच्यात वाद पेटल्याचे दिसते.
तर झाले असे की, प्रथम फलंदाजी (INDvsSA) करताना भारताकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि इशान (Ishan Kishan) विस्फोटक फलंदाजी करत होते. अशात डावातील नववे षटक टाकण्यासाठी शम्सी आला. शम्सीच्या षटकातील चौथ्या चेंडूवर इशानने पुढे येत फटका मारला आणि चेंडू षटकारासाठी पाठवला. कोणत्याही गोलंदाजाला त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजाने षटकार मारलेला आवडत नाही. शम्सीबाबतही असेच झाले.
आपल्या चेंडूवर इशानने खणखणीत षटकार मारल्याचे पाहून शम्सी (Ishan Kishan Six On Tabraiz Shamsi Ball) चिडला आणि त्याने इशानला रागारागात काहीतरी म्हटले. दुसरीकडे इशाननेही शम्सीच्या उत्तराला प्रत्युत्तर दिले. इशानला चिडल्याचे पाहून शम्सीने माघार घेतली आणि तो त्याच्या तोंडाला न लागता गोलंदाजीसाठी रनअप घेण्यासाठी माघारी परतला. याच षटकात षटकार मारण्याबरोबर इशानने शेवटच्या चेंडूवर चौकारही मारला. सामन्यातील या छोट्याशा वादाचा (Ishan Kishan & Tabraiz Shamsi Heated Argument) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) June 14, 2022
दरम्यान इशानने या सामन्यात ३५ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. तसेच त्याने ऋतुराजसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारीही केली. तसेच अर्धशतके करत दोन्हीही सलामीवीर एका खास यादीतही सहभागी झाले आहेत. २०२० नंतर टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या सलामी जोडींच्या यादीत त्यांचे नाव जोडले गेले आहे. या यादीत केएल राहुल-शिखर धवन, रोहित शर्मा-विराट कोहली आणि केएल राहुल-रोहित शर्मा, या जोड्यांची नावे आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना यजमान भारतीय संघाने निर्धारित २० षटकात १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ १३१ धावांवरच सर्वबाद झाला. परिणामी भारताने ४८ धावांनी हा सामना जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘इशान-ऋतुराज’ जोडीची कमाल; तब्बल दहा वर्षापूर्वीचा विक्रम मोडला
पहिले पाढे पंचावन्न! कटकमध्ये पंतची जी चूक झाली, तिच विशाखापट्टणमध्येही झाली, पाहा व्हिडिओ
INDvsSA T20: मालिकेत पुनरागमनाचे श्रेय ‘कॅप्टन’ रिषभ पंतने दिले ‘या’ खेळाडूंना