भारतीय संघाचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. ज्यामुळे अलीकडेच तो टीम इंडियामध्ये कधी परतणार या मुद्या संदर्भात तो चर्चेत आहे. सध्या सुरू असलेल्या बुची बाबू स्पर्धेत झारखंडकडून खेळताना त्याने 86 चेंडूत शतक झळकावले, तर त्याच्या शानदार विकेटकीपिंगचा व्हिडिओही व्हायरल झाला. या कामगिरीच्या जोरावर चाहते त्याच्या लवकरच टीम इंडियात पुनरागमन करणार असल्याची अटकळ बांधू लागली आहेत. दरम्यान, ईशानला पुनरागमन करण्यासाठी काय करावे लागेल हे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार , जय शहांनी स्पष्ट केले आहे की, जर ईशान किशनला टीम इंडियामध्ये परतायचे असेल तर त्याला नियमांचे पालन करावे लागेल. येथील नियम म्हणजे त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. हा तोच इशान किशन आहे ज्याला बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे केंद्रीय करार यादीतून वगळले होते.
ईशान किशनने यापूर्वी बीसीसीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले असेल, पण आता त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. बुची बाबू टूर्नामेंटमध्ये त्याने मध्य प्रदेश विरुद्ध 86 चेंडूत शतक झळकावले, पण त्याची खेळी आणखी एका कारणासाठीही खास होती. वास्तविक, कठीण परिस्थितीत खेळत त्याने 61 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु त्यानंतर त्याने स्फोटक फलंदाजी केली.
61 चेंडूत अर्धशतक आणि पुढच्या 50 धावा त्याने फक्त 25 चेंडूत केल्या. या काळात त्याने 39 चेंडूत केवळ 9 चेंडूत षटकार ठोकले होते. किशनने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना (टी20) नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात किशन 5 चेंडू खेळून शून्य धावांवर बाद झाला होता.
हेही वाचा-
मुंबईच्या रस्त्यावर लॅम्बोर्गिनीत फिरताना दिसला रोहित, कारचा क्रमांक जिंकतोय चाहत्यांची मने
श्रीलंकन क्रिकेटर अडकला डोपिंगमध्ये, बोर्डाने अनिश्चित काळासाठी केले निलंबित
द्रविडचा मुलगा समितचे महाराजा ट्रॉफीमध्ये पदार्पण, पहिल्या सामन्यात कशी राहिली कामगिरी?