लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 391 धावांवर संपला. जो रूटच्या नाबाद 180 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडच्या संघाने 27 धावांची आघाडीही घेतली आहे. आता चौथ्या दिवशी इंग्लंडला मोठे लक्ष्य देण्याची जबाबदारी भारतीय फलंदाजांवर असेल. विशेषतः मधल्या फळीतील फलंदाजावर विशेष मदार असेल.
तिसऱ्या दिवसाचा खेळ बघता, इंग्लंड संघाने भारतीय संघाकडून हा सामना हिरावून घेतला असल्याचे दिसत आहे. दरम्यान इशांत शर्माने सलग दोन बळी घेत इंग्लंड संघाला पिछाडीवर ढकलले होते. यामुळे इंग्लंडचा डाव गुंडाळण्यात भारतीय संघाला मदत झाली होती. मात्र, हे दोन बळी घेण्यात इशांत शर्मा इतकेच कर्णधार विराट कोहलीचेही श्रेय होते.
खरं तर, ज्या षटकाच्या सुरुवातीला इशांतने अष्टपैलू मोईन अली आणि सॅम करनला बाद केले, त्याच षटकाच्या सुरुवातीला इशांतने विराटला त्याच्याकडे बोलावले होते. आणि त्यांना कसे बाद करायचे याची योजना आखली होती. इशांतने स्लिप्सला थोडे पुढे ठेवण्याबद्दल विराटला सांगितले आणि विराटनेही आपल्या गोलंदाजाचे म्हणणे ऐकत क्षेत्ररक्षण नेमला.
त्यानंतर इशांत आणि विराटला हवे होते तेच झाले. पहिल्यादा खेळपट्टीवर स्थिरावलेला मोईन अली विराटच्या हातून स्लिपमध्ये बाद झाला. २७ धावांवर त्याला पव्हेलियनला परतावे लागले. त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर सॅम करन स्लिपमध्ये रोहित शर्माच्या हातून शून्यावर झेलबाद झाला आणि इशांत व विराटचे डावपेच यशस्वी झाले.
planning of virat and ishant#ENGvsINDonSonyLIV pic.twitter.com/wHZLyFzEa6
— Shubham Sharma (@Shubham73106588) August 14, 2021
इशांत अन् विराटचे हे नियोजन आखतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. इशांतने मोईन अली आणि सॅम करनला बाद केल्यानंतर खालच्या फळीला बाद करणे भारतीय संघाला सोपे गेले. ऑलि रॉबिन्सन 6 धावांवर मोहम्मद सिराजच्या चेंडूवर पायचित झाला. तर मार्क वुडला 5 धावांवर रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाने मिळून धावबाद केले. अशाप्रकारे 391 धावांवर इंग्लंडचा डाव गुंडाळण्यात भारतीय संघ यशस्वी झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
नॉटिंघम कसोटीचा हिरो लॉर्ड्समध्ये बनला विलेन, चाहत्यांवर आली ‘बुमराह प्लिज नो बॉल’ म्हणण्याची वेळ
दुखापतग्रस्तांना पुन्हा संधी तर बदली खेळाडूंचे कटणार तिकीट; बीसीसीआयच्या निर्णयाने खेळाडू पेचात
एका ग्राउंड ऑफिसरने शमी, बेयरस्टोसहित पंचांनाही थकवलं, व्हिडिओ बघून आवरणार नाही हसू