बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (४ आॅगस्ट) ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.
मात्र या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने ८ बळी मिळवत चमकदार कामगिरी केली.
इशांतने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेत या सामन्यात आपला अनुभव पणाला लावला.
इशांतने त्याच्या या चमकदार कामगिरीचे श्रेय इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटला दिले आहे.
इशांत कौंटी क्रिकेटच्या डिव्हीजन दोनमध्ये ससेक्स संघासाठी चार सामने खेळला. यामध्ये त्याने १५ विकेट मिळवत एक अर्धशतकही झळकावले होते.
भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इशांतने त्याच्या या सामन्यातील यशाचे श्रेय कौंटी क्रिकेटला दिले आहे.
“२०१८ च्या आयपीएलमध्ये मला कोणत्याही संघात जागा मिळाली नाही त्यामुळे मी नाराज होतो. त्यामुळे मी कौंटी खेळण्याचा निर्णय घेतला. मला कौंटी क्रिकेट खेळण्याचा लाभ झाला हे तुम्ही पाहिलेच असेल.” असे इशांत पत्रकार परिषदेत म्हणाला.
“यावर्षी मी ससेक्ससाठी खेळलो होतो. त्यामुळे मला ड्यूक चेंडूने गोलंदाजी करण्याचा अनुभव आला होता. तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करताना विदेशात एका डावात पाच विकेट, विशेष म्हणजे दुसऱ्या डावात मिळवता तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त समाधन नसते.” असे इशांत शर्मा पुढे म्हणाला.
इशांत शर्माचा त्याच्या कारकिर्दीतला चौथा इंग्लंड दौरा आहे. तसेच त्याच्याकडे कौंटी क्रिकेटचा अनुभवही आहे त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी भारतासाठी त्याची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले
-टॉप १०: टीम इंडिया पराभूत, परंतु या १० विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही