13 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान झालेल्या पदार्पणाच्या सामन्यात इशांतने 5 विकेट्स घेतल्या आहेत. यासाठी त्याने फक्त 69 धावा दिल्या आहेत.
हा सामना अनिर्णित राहीला. इशांतने पहिल्या डावात 53 धावा देत 3 विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या डावात 16 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आहेत. याचबरोबर इशांतने फलंदाजी करताना 22 धावाही केल्या आहेत.
याबरोबरच दुसऱ्या सामन्यातही या खेळाडूने चमकदार कामगिरी केली. परंतू त्याने ही कामगिरी गोलंदाजीत न करता फलंदाजीत केली. ससेक्स विरुद्ध लिस्टेशायर सामन्यात १०व्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने चक्क ६६ धावांची खेळी केली. यामुळे त्याची मोठी चर्चा झाली.
१४१ चेंडूंचा सामना करताना त्याने मैदानावर चक्क ३ तास फलंदाजी केली. त्यात त्याने ६ चौकार आणि १ षटकार खेचला.
इशांतची ही कामगिरी भारताच्या दृष्टीने चांगली आहे, कारण भारत जुलै महीन्यात इंग्लडचा दौरा करणार आहे. इशांतला यावर्षी आयपीएल लिलावात कोणत्याच संघाने विकत न घेतल्याने त्याने काउंटी क्रिकेटचा मार्ग धरला आहे.
पहा या खेळीचा विडीओ-
REPLAY: A moment of history as Indian superstar @ImIshant scores his maiden first-class fifty and it comes in a Sussex shirt. #gosbts pic.twitter.com/Lp2Q7axh6j
— Sussex Cricket (@SussexCCC) April 21, 2018
REPLAY: All-rounder @ImIshant follows his 66 with the bat with a third Leicestershire wicket 😉 #gosbts pic.twitter.com/L0UjPIlMHu
— Sussex Cricket (@SussexCCC) April 22, 2018