मुंबई । स्टार खेळाडू एम एस धोनी याने त्याच्या नेतृत्वात भारताला दोन विश्व आणि अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. त्यामुळे इतिहासाच्या पानांमध्ये धोनीचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले गेले. 2007 मध्ये त्याच्या नेतृत्वात, भारत टी 20 वर्ल्डकपचा पहिला विजेता ठरला. त्यानंतर 2011 मध्ये वनडे विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स करंडक जिंकून देऊन तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला.
सौरव गांगुली व्यतिरिक्त भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेण्यातही धोनीची महत्वाची भूमिका आहे. विशेषत: खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी. धोनीच्या नेतृत्वात बर्याच खेळाडूंनी आपली चमक दाखविली, ज्यात वेगवान गोलंदाज इशांत शर्मा देखील एक आहे. दीप दास गुप्ता यांच्याशी झालेल्या चर्चेत इशांत शर्माने धोनी आपल्या वयावर कशी चेष्टा करतो याचा खुलासा केला.
इशांत म्हणाला की, ” खरं तर माझे वय 32 पेक्षा जास्त आहे. माझी बायको मला म्हाताराही म्हणते. मलाही माही भाईचा नेहमी एसएमएस येतो. तोही बोलतो काय करतोय म्हातार्या. माही भाई म्हणतो की तुझे केवळ 32 वर्षांचा आहे मात्र तू 52 वर्षांच्या म्हाताऱ्या सारखे दिसतोच.”
32 वर्षीय इशांत शर्माने धोनीच्या नेतृत्त्वाखाली बऱ्याच वेळा चांगले प्रदर्शन केले. 2014 मध्ये लॉर्ड्स येथे झालेल्या सामन्यात इशांतने भेदक गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांचे धाबे दणाणून सोडले होते. त्या सामन्यात ईशांतने 74 धावा देऊन 7 बळी घेतले.
दोघे दिसतील आयपीएलमध्ये
लवकरच धोनी आणि ईशांत युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार्या आयपीएलच्या 13 व्या सत्रात खेळताना दिसतील. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणार आहे तर इशांत दिल्ली कॅपिटलच्या संघात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येईल.