भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सातत्याने चर्चेत असतो. आयपीएल 2023 जिंकल्यानंतर त्याचे अनेक जण कौतुक करत आहे. त्याचवेळी त्याच्यासोबत खेळलेल्या काही माजी क्रिकेटपटूंनी अशी काही वक्तव्ये केली आहेत, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला. असे असतानाच आता भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने धोनीचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाने जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाला नुकतीच 23 जून रोजी 10 वर्ष पूर्ण झाली. धोनीच्या नेतृत्वातच भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली होती. अंतिम सामन्यात ईशांत शर्मा याने मोक्याच्या क्षणी दोन बळी मिळवत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलेले. त्या विजयाच्या आठवणी जागवत असताना ईशांत शर्मा याने धोनीचे कौतुक केले. तो म्हणाला,
“दबावाच्या परिस्थितीतही अतिशय संयमी आणि शांत डोक्याने निर्णय घेण्याची क्षमता धोनीकडे आहे. त्याची खेळाची समज आणि सिक्स्थ सेन्स कमालीचा वाटतो. यष्ट्यांमागून तो अनेकदा खेळ बदलतो. कोणत्याही परिस्थितीत खेळ चालवणे त्याच्याकडून शिकण्यासारखा गुण आहे.”
चेन्नई सुपर किंग्सने धोनीच्या नेतृत्वात 2023 आयपीएल जिंकली होती. विश्वभरातून त्याचे कौतुक होत असताना, त्याचे संग सहकारी राहिलेले हरभजन सिंग व गौतम गंभीर यांनी 2011 वनडे विश्वचषकाबाबत काही वादग्रस्त विधाने केलेली. तो विश्वचषक संपूर्ण संघाने जिंकलेला मात्र त्याचे श्रेय केवळ धोनीला दिले जाते असे त्यांचा आरोप होता. त्या पार्श्वभूमीवर आता ईशांतने केलेले वक्तव्य अतिशय महत्त्वाचे ठरते. याच मुलाखतीत ईशांतने विराट कोहली याचे देखील कौतुक केले. विराटने भारतीय संघात फिटनेस कल्चर आणले असे त्याने म्हटले.
(Ishant Sharma Said MS Dhoni Have Sixth Sense Behind Stumps)
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा एकाच वेळी खेळणार दोन टीम इंडिया! एक भारतात तर दुसरी चीनमध्ये
“हार्दिकला लगेच वनडे संघाचा कर्णधार करा”, शास्त्रींनी केली बीसीसीआयकडे मागणी