मुंबई । भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा कसोटी संघातील महत्त्वाचा सदस्य आहे. 31 वर्षीय इंशातने 2007 मध्ये कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्यांनंतर पुढच्याच वर्षी प्रथम टी -20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर त्याला अर्जुन पुरस्कार मिळाला.
इशांतने या दरम्यान सांगितले की, तो कधीपर्यंत क्रिकेट खेळणार आहे.
इशांतने म्हटले की, “मला अगदी लहान वयात क्रिकेटविषयीची आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून मी दररोज माझे शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. माझा खेळ सुधारण्यासाठी मी जे चांगले पाऊल उचलेलं आहे. यापाठीमागचा उद्देश केवळ भारताचे नाव उंचावणे हेच आहे.”
त्याने आपल्या अधिकृत ट्विटरवर लिहिले की, “जोपर्यंत माझे शरीर साथ देत राहिल तोपर्यंत मी असेच खेळत राहीन आणि जर देवाची कृपा कायम राहिली तर ती सुरूच राहील.”
भारतासाठी 97 कसोटी, 80 वनडे आणि 14 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या इशांतची, यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी निवड झालेल्या 27 खेळाडूंमध्ये समावेश आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साठी देशाबाहेर गेल्यामुळे शनिवारी तो पुरस्कार सोहळ्यात सहभागी होऊ शकला नव्हता.
पुढे बोलताना तो म्हणाला, “माझ्या नावाच्या मान्यतेसाठी मी क्रीडा मंत्रालयाचे मनापासून आभार मानतो. या प्रवासात पुढे जाण्यासाठी मदत व समर्थन केल्याबद्दल अखेरीस बीसीसीआयचे आभार. मी अर्जुन पुरस्कार सर्व विजेत्यांचे अभिनंदन करू इच्छितो.”
इशांत आयपीएलच्या 13 व्या हंगामात खेळण्यासाठी युएईमध्ये आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्या या स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करेल. इशांतशिवाय राष्ट्रीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, तर महिला संघाची अष्टपैलू दीप्ती शर्मा हिला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.