कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी केवळ ३ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या ऐतिहासिक सामन्यात एकमेकांशी भिडतील. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान हा सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून इशांत शर्मा मैदानात उतरेल. ईशांतने नुकतेच प्रसारण वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोलंदाजीविषयी एक महत्त्वपूर्ण विधान केले.
“तरीदेखील चेंडू रिव्हर्स स्विंग होणार”
सध्या भारतीय क्रिकेट संघातील सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो ईशांत शर्मा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चा अंतिम सामन्यात भारताच्या वेगवान मार्याचे नेतृत्व करेल. ईशांतने आपल्या कारकिर्दीत आत्तापर्यंत १०१ कसोटी सामने खेळताना ३०३ बळी मिळवले आहेत.
या ऐतिहासिक सामन्यात सहभागी होण्यापूर्वी ईशांतने प्रसारण वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “सध्या इंग्लंडमधील वातावरणाचा विचार केल्यास बिना लाळ लावतादेखील चेंडू रिव्हर्स स्विंग करता येईल. फक्त ही जबाबदारी संपूर्ण सामन्यात कोणालातरी उचलावी लागेल. आम्हाला सरावाची पद्धत थोडी बदलावी लागली. भारतात असल्यावर चेंडू उशीराने रिव्हर्स होतो. मात्र, इंग्लंडमध्ये चेंडूची लेन्थ पुढे ठेवल्यास नियमितपणे स्विंग मिळेल.”
इशांत भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू असला तरी, त्याच्या जागी सर्वात अनुभवहीन मोहम्मद सिराज याला संधी मिळू शकते असा अंदाज लावला जात आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या:
फुटवर्क कपल! चहल दांम्पत्याचा नवा डान्स व्हिडिओ आला समोर
या कर्णधाराची छातीठोकपणे भविष्यवाणी, म्हणाला भारतच होईल कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता
न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने उलगडले संघाच्या विजयाचे रहस्य