भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याचे जगभरात चाहते आहेत. मागील पंधरा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या विराटने आपल्या शानदार खेळाने सर्वांचे मन जिंकले आहे. विराटचा हा आतापर्यंतचा प्रवास भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने अगदी जवळून पाहिला आहे. नुकतेच एका मुलाखतीत बोलताना त्याच्याबद्दल अनेक खुलासे केले.
ईशांतने नुकतीच एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी विराट कोहलीचा आजवरचा प्रवास सांगितला. तो म्हणाला,
“मी विराटच्या आयुष्याचे सर्व टप्पे पाहिले आहेत. मला अजूनही आठवते की तो केवळ सतरा वर्षाचा असताना त्याच्या वडीलांचे निधन झाले. अशावेळी त्याने फलंदाजीला येत एक असाधारण खेळी केली होती. त्याच्यात अशी समज पाहून सर्वजण अवाक होते. त्याच्या जागी मी असतो तर असे करू शकलो नसतो.”
विराटच्या स्वभावाविषयी बोलताना तो म्हणाला,
“विराटच्या डिक्शनरीत आशा हा शब्द नाही. त्याचा फक्त विश्वास या शब्दावर भरवसा असून तो कठोर मेहनत करण्यावर भर देतो. विराटने भारतीय संघात एक फिटनेस कल्चर आणले. तो कर्णधार झाल्यानंतर प्रत्येक जण अधिकाधिक फिट कसा राहील याकडे लक्ष देत होता. मोहम्मद शमी आणि आत्ताच्या वेगवान गोलंदाजातील साम्य तुम्हाला त्याचे उदाहरण म्हणून वापरता येईल. शमी आजही इतरांपेक्षा अधिक फिट वाटतो.”
याव्यतिरिक्त त्याने अनुष्का शर्मा यांच्याशी लग्न झाल्यापासून त्याच्यामध्ये मोठा बदल झाल्याचे मान्य केले. विराट व ईशांत वयोगट क्रिकेटपासून दिल्लीसाठी खेळत. त्यानंतर दोघांनी भारतीय संघासाठी अनेक वर्ष एकत्रित क्रिकेट खेळले. या दोघांच्याही नावे भारतासाठी 100 पेक्षा अधिक कसोटी खेळण्याचा पराक्रम नोंद आहे.
(Ishant Sharma Talk About Virat Kohli Life All Phases)
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा एकाच वेळी खेळणार दोन टीम इंडिया! एक भारतात तर दुसरी चीनमध्ये
“हार्दिकला लगेच वनडे संघाचा कर्णधार करा”, शास्त्रींनी केली बीसीसीआयकडे मागणी