पुणे, 5 मार्च 2024: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या वतीने आयोजित 19व्या आंतर युनिट पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड(पीएसपीबी) बिलियर्ड्स अँड स्नूकर स्पर्धेत प्रोफेशनल गटात इशप्रीत सिंग चड्डा, आलोक कुमार,एस.श्रीकृष्ण, ध्वज हरिया, रयान रझमी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत प्रोफेशनल गटात चुरशीच्या लढतीत बीपीसीएलच्या इशप्रीत सिंग चड्डाने आयओसीएलच्या आदित्य मेहताचा 3-2(00-102(102), 50-100(65), 100(53)-00, 101(54)-79, 102-77(70)) असा संघर्षपूर्ण पराभव केला. आदित्य मेहता याने आपल्या खेळात पहिल्या, दुसऱ्या व पाचव्या फ्रेममध्ये 102,65, 70 गुणांचा ब्रेक नोंदवून कडवी झुंज दिली. ओएनजीसीच्या आलोक कुमार याने बीपीसीएलच्या शाहबाज खानचा 3-2(68-101, 87-101, 101-57, 101-02, 100-55) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. बीपीसीएलच्या एस.श्रीकृष्ण याने ओएनजीसीच्या स्पर्श फेरवानीचे आव्हान 3-0(101(66)-67, 101(68)-87, 103(98)-28) असे सहज मोडीत काढले. आयओसीएलच्या ध्वज हरियाने बीपीसीएलच्या देवेंद्र जोशीला 3-0 (102-48, 100(71)-10, 101(73)-50) असे पराभूत केले.
ओएनजीसीच्या रयान रझमी याने बीपीसीएलच्या मनन चंद्राचा 3-0(100-81(51), 102(74)-65, 101-62) असा तर, रूपेश शहा याने आयओसीएलच्या लक्ष्मण रावतचा 3-0(100-55, 101(81)-24, 101(97)-03) असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
हौशी गटात पहिल्या फेरीत दुरलोव बोरा, विपिन वसावा, कादरी मुरलीराज, अनिल शर्मा, मंजुनाथ, परेश करमरकर यांनी आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, पीएसपीबीचे सहसचिव गौतम वदेहरा, एमएनजीएलचे सीएफओ एम.के.सारथी, एमएनजीएलचे एचआर विभागाचे महाव्यवस्थापक सचिन काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: वैयक्तिक बिलियर्ड्स: प्रोफेशनल गट: पहिली फेरी:
रूपेश शहा(ओएनजीसी)वि.वि.लक्ष्मण रावत(आयओसीएल) 3-0(100-55, 101(81)-24, 101(97)-03);
एस.श्रीकृष्ण(बीपीसीएल)वि.वि.स्पर्श फेरवानी(ओएनजीसी) 3-0(101(66)-67, 101(68)-87, 103(98)-28);
ध्वज हरिया(आयओसीएल)वि.वि.देवेंद्र जोशी(बीपीसीएल)3-0 (102-48, 100(71)-10, 101(73)-50);
इशप्रीत सिंग चड्डा(बीपीसीएल)वि.वि.आदित्य मेहता(आयओसीएल) 3-2(00-102(102), 50-100(65), 100(53)-00, 101(54)-79, 102-77(70) );
आलोक कुमार(ओएनजीसी)वि.वि.शाहबाज खान(बीपीसीएल) 3-2 (68-101, 87-101, 101-57, 101-02, 100-55);
रयान रझमी(ओएनजीसी)वि.वि.मनन चंद्रा (बीपीसीएल)3-0(100-81(51), 102(74)-65, 101-62);
हौशी गट: पहिली फेरी:
दुरलोव बोरा (एनआरएल)वि.वि.जयप्रकाश शेट्टी (एमआरपीएल)81-74;
विपिन वसावा(जीएआयएल)वि.वि.अर्जुन राव(ऑईल इंडिया) 124-83;
कादरी मुरलीराज (एमआरपीएल)वि.वि.संदीप कुमार(एचपीसीएल) 58-49;
अनिल शर्मा(जीएआयएल)वि.वि.सौमेन बी.(ऑइल इंडिया) 123-93;
मंजुनाथ (एमआरपीएल)वि.वि.नितेश गुप्ता(एचपीसीएल) 114-39;
परेश करमरकर(ऑइल इंडिया)वि.वि.सुरेंद्र टटवाल(एचपीसीएल) 107-41;
महत्वाच्या बातम्या –
‘तो पावरप्ले आणि डेथ ओवर्समध्ये गोलंदाजी करत नाही…’, कमिन्स हैदराबादचा कर्णधार बनताच प्रश्न उपस्थित
दोन दिवसाच चार खेळाडू खेळणार 100वा कसोटी सामना; दिग्गजांमध्ये आर अश्विनही सामील