कधीकाळी भारतीय क्रिकेट संघाचा भाग राहिलेला वेगवान गोलंदाज ईश्वर चंद पांडे याने सोमवारी (12 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मध्य प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाने इंस्टाग्रामद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. पांडेने टी20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर त्याने निवृत्तीबद्दल सर्वांना माहिती दिली आहे.
पांडेने (Ishwar Pandey) इंस्ट्राग्रामद्वारे निवृत्तीची घोषणा (Ishwar Pandey Retirement) करताना लिहिले की, “आज तो दिवस आला आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मी 2007 मध्ये या प्रवासाला सुरुवात केली होती आणि तेव्हापासून ते आतापर्यंत मैदानावर आणि मैदानाबाहेर मी भरपूर क्षणांचा आनंद घेतला आहे. मला इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सहभागी केले गेले होते, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. परंतु मला या गोष्टीचे दुख आहे की, मला देशासाठी खेळण्याची संधी मिळू शकली नाही”.
https://www.instagram.com/p/CiZ4O74PizN/?utm_source=ig_web_copy_link
33 वर्षीय पांडेला भारतीय संघाकडून एकही क्रिकेट सामना खेळायला मिळाला नाही. तो 2014 सालच्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात निवडला गेला होता. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरला. तो न्यूझीलंड दौऱ्यावर भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचा भाग होता. तो मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून भारतीय संघात निवडला गेलेला पहिलावहिला क्रिकेटपटू राहिला आहे.
याखेरीज त्याने आयपीएलमध्येही आपला सहभाग नोंदवला होता. तो आयपीएलमध्ये एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा भाग राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याने 25 सामने खेळले आहेत. या 25 सामन्यांमध्ये त्याने 18 विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नईव्यतिरिक्त पुणे वॉरियर्स आणि रायझिंग सुपर जायंट्स संघाचा तो भाग राहिला आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने 75 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये मध्य प्रदेश संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. या 75 सामन्यांमध्ये त्याने 263 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ भारतीयाच्या विकेटने २९ वर्षांपूर्वी झाली होती शेन वॉर्न पर्वाची सुरुवात…
शेन वॉर्नने १७ वर्षांपूर्वी कसोटीमध्ये केला होता ‘ऐतिहासिक’ पराक्रम, इंग्लंडचा ट्रेस्कोथिक ठरला होता ‘विक्रमी’ बळी
एकेकाळी भारत सोडणार होता ‘हा’ खेळाडू, आता आयुष्यातील पहिला टी20 विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज