fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयएसएल २०२०: एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील सामना बरोबरीत

ISL 2020-21 FC Goa vs NorthEast United FC Angulo, Sylla goals make it FCG 1-1 NEUFC

November 30, 2020
in टॉप बातम्या, फुटबॉल
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सोमवारी (३० नोव्हेंबर) एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरी सुटली. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर पहिल्या सत्रातील बरोबरीची कोंडी अखेरपर्यंत सुटू शकली नाही.

गिनीचा 29 वर्षीय स्ट्रायकर इद्रीसा स्यीला याने पेनल्टीवर नॉर्थईस्टचे खाते उघडले. गोव्याने प्रतिआक्रमणाची क्षमता प्रदर्शित करीत तीन मिनिटांत बरोबरी साधली. स्पेनच्या 36 वर्षीय इगोर अँग्युलो याने गोल केला.

नॉर्थईस्टची तीन सामन्यांतील ही दुसरी बरोबरी असून एका विजयासह त्यांचे पाच गुण झाले. त्यांनी दुसरे स्थान राखले. जुआन फरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गोव्याची तीन सामन्यांनंतर पहिल्या विजयाची प्रतिक्षा लांबली. दोन बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे दोन गुण झाले असून गुणतक्त्यात सातवे स्थान आहे.

नॉर्थईस्टचे प्रशिक्षक न्यूस यांनी दुसऱ्या सत्रात शुभाशिष रॉय याच्याऐवजी गुरमीत सिंग याला बदली गोलरक्षक म्हणून पाचारण केले. दुसऱ्या सत्रात चुरश शिगेला पोचली असताना गोव्याचा गोंझालेझ आणि नॉर्थईस्टचा बदली खेळाडू रोच्छार्झेला यांच्यात किरकोळ झटापट झाली.

गिनीच्या 29 वर्षीय स्यीलाने याआधी केरला ब्लास्टर्सविरुद्ध बदली खेळाडू म्हणून अखेरच्या मिनिटाला नॉर्थईस्टला बरोबरी साधून दिली होती. त्यामुळे प्रशिक्षक जेरार्ड न्यूस यांनी त्याला अपेक्षेप्रमाणे स्टार्ट दिली. स्यीलाने प्रशिक्षकांचा तसेच संघाचा विश्वास सार्थ ठरविला.

त्यानंतर 38व्या मिनिटाला स्यीलाने छातीने चेंडूवर नियंत्रण मिळवत गोलक्षेत्रात मुसंडी मारली. त्यावेळी गोव्याचा बचावपटू इव्हान गोंझालेझ याने त्याला धक्का देत पाडले. त्यामुळे रेफरी क्रीस्टल जॉन यांनी नॉर्थईस्टला पेनल्टी बहाल केली. स्यीला पेनल्टी घेत असतानाच नॉर्थईस्टचा लालरेम्पुईया फानाई आधीच पुढे सरसावला. स्यीलाने लक्ष्य साधले, पण हा प्रयत्न अवैध असल्याचा इशारा झाला. परिणामी स्यीलास पेनल्टी पुन्हा घ्यावी लागली. त्याने यावेळीही गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याचा अंदाज चुकविला. स्यीलाचा हा मोसमातील दुसरा, तर नॉर्थईस्टचा आयएसएलमधील 99वा गोल ठरला.

गोव्याने तीन मिनिटांत बरोबरी साधली. 43व्या मिनिटाला मध्य फळीतील ब्रँडन फर्नांडीस याने जादुई चाल रचली. त्याने मोकळीक मिळवित गोलक्षेत्रात अप्रतिम पास देताच अँग्युलोने गोलची कामगिरी फत्ते केली.

त्यानंतर 34व्या मिनिटाला स्यीला यास उत्तम संधी मिळाली होती. नॉर्थईस्टच्या बचाव फळीतील गुरजींदर कुमारने रचलेल्या चालीवर त्याने हेडिंग केले, पण ते स्वैर होते. चेंडू नेटच्या बाहेरून जाताच स्यीला यास निराशा लपविता आली नाही.


Previous Post

Video: महान फुटबॉलपटू मॅराडोना यांना मेस्सीकडून खास अंदाजात श्रद्धांजली

Next Post

‘भारतीय संघ शाळकरी मुलांचा संघ आहे का?’, मांजरेकरांच्या ट्विटवर चाहत्याची तिखट प्रतिक्रिया

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC & BCCI

'भारतीय संघ शाळकरी मुलांचा संघ आहे का?', मांजरेकरांच्या ट्विटवर चाहत्याची तिखट प्रतिक्रिया

Photo Courtesy: Twitter/ ICC

'कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे', एलपीएलमध्ये वादळी खेळी करणाऱ्या अष्टपैलूचे प्रतिपादन

Photo Courtesy: Twitter/ICC

'रोहित खोलीच्या बाहेरही येऊ शकत नाही', भारतीय दिग्गजांचे बीसीसीआयवर ताशेरे

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.