पणजी 14 फेब्रुवारी: अंतिम टप्प्यात आलेल्या हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील मंगळवारच्या लढतीद्वारे (१५ फेब्रुवारी) फॉर्मात असलेल्या एटीके मोहन बागानला रोखण्यास एफसी गोवा उत्सुक आहे. उभय संघ विजयात सातत्य राखण्याचा प्रयत्न करतील.
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या मोहन बागानच्या खात्यात १४ सामन्यांतून २३ गुण आहेत. टॉपला असलेल्या हैदराबाद एफसी (१६ सामन्यांतून २६ गुण) आणि त्यांच्यात केवळ एका विजयाचा फरक आहे. सलग दहा सामन्यांत पराभव न पाहिलेल्या एटीकेला विजयी हॅटट्रिक साधण्याची संधी आहे. मागील दोन सामन्यांत अव्वल स्थानी असलेल्या हैदराबाद एफसी आणि तळातील नॉर्थ ईस्ट युनायटेडवर मात केली तरी मोहन बागानचे दोन्ही विजय सफाईदार नाहीत. अनुभवी संदेश झिंगनने नॉर्थ ईस्टविरुद्धच्या सामन्याद्वारे यंदाच्या हंगामात प्रथमच अंतिम संघात स्थान मिळवले. बचावफळीतील हा खेळाडू आयएसएलमधील १००वा सामना खेळण्यासाठी आतुर आहे. जॉनी कौकानेही मागील लढतीत चमकदार खेळ करताना एक गोल केला. तसेच एक असिस्ट केला.
मागील सामन्यात आयएसएलमधील गोलांच्या फरकाने विजय मिळवणाऱ्या एफसी गोवाच्या विजयात जॉर्ज ऑर्टिझ चमकला. त्याने पहिलीवहिली हॅटट्रिक नोंदवली. तसेच आठव्या हंगामातील गोलसंख्या सातवर नेली. सर्वोत्कृष्ट खेळाच्या बळावर एका हंगामात जास्तीत जास्त गोल करण्यातही ऑर्टिझला यश आले आहे. मागील हंगामात त्याने १२ सामन्यांत अर्धा डझन गोल केले होते.
एफसी गोवाला १६ सामन्यांतून १८ गुण मिळवता आले असले तरी अद्याप चार सामने शिल्लक असल्याने त्यांना प्ले-ऑफ फेरी गाठण्याची थोडी फार आशा आहे. मागील लढतीत चेन्नईयन एफसीवर पाच गोल चढवणाऱ्या गोव्याचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. त्याचा फायदा एटीके मोहन बागानसारख्या अव्वल संघाशी दोन हात करताना होईल,
एटीके मोहन बागान प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक हुआन फेरँडो यांना वाटतो. मागील लढतीत त्यांनी एफसी गोवावर २-१ अशी निसटती मात केली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात एफसी गोवाने खेळ उंचावला आहे. तसेच सातत्य राखले तरी मागील दोन सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने मात आलेली नाही, हेही मोहन बागान संघ व्यवस्थापनाला लक्षात ठेवावे लागेल.
प्रत्येक सामना हा अंतिम सामन्याप्रमाणे असतो. आमच्यासाठी एफसी गोवाविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे, असे मी ठामपणे सांगतो. त्यामुळे गुणतालिकेतील स्थान महत्त्वाचे





