गोवा| फॉर्मात असलेल्या जमशेदपूर एफसीने मंगळवारी (१ मार्च) डबल धमाका केला. अनेक दिवस टॉपला असलेल्या हैदराबाद एफसीवर ३-० असा विजय मिळवत इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील उपांत्य फेरी निश्चित केली. यंदाच्या हंगामात सेमीफायनल प्रवेश करणारा तो दुसरा संघ आहे.
सर्वाधिक पेनल्टी कॉर्नर मिळवताना चेंडू पास करण्यात तसेच चेंडूवर सर्वाधिक वेळ ताबा मिळवत जमशेदपूरने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. पीटर हार्टलीने २८व्या तसेच डॅनियल चिमा चुक्वुने ६५व्या मिनिटाला गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. या दोन्ही गोलमध्ये अलेक्झांडर लिमा हा कॉमन आहे. दुसऱ्या सत्रात डॅनियल चुक्वुने जमशेदपूरची आघाडी वाढवली. अलेक्झांडर लिमा याच्या अचूक पासवर डॅनियलने चेंडूला अचूक गोलपोस्टमध्ये धाडले. त्यापूर्वी, लिमा याच्याच पासवर पीटर हार्टलीने गोल केला.
मात्र, जीएमसी ऍथलेटिक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाचव्या मिनिटाला जमशेदपूरचे खाते उघडले गेले. त्याचे क्रेडिट प्रतिस्पर्धी संघातील चिंग्लेन्सना सिंग याला जाते. अलेक्झांडर लिमा आणि पीटर हार्टली यांनी चेंडूवर ताबा राखताना गोलपोस्टमध्ये धडक मारली. मात्र, मोबाशिर रहमानने चेंडू क्लियर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रिकल करताना चेंडू चिंग्लेन्सना याला लागून गोल जाळ्यामध्ये गेला. त्यामुळे हा स्वयंगोल ठरला. पिछाडीवर पडलेल्या हैदराबादने उत्तरार्धात आक्रमण अधिक तेज केले तरी जमशेदपूरच्या बचावापुढे त्यांचे प्रयत्न थिटे पडले. त्यातच ६८व्या मिनिटाला मोबाशिर रहमानला रेड कार्ड दाखवल्यामुळे जमशेदपूरला उर्वरित २२ मिनिटांत दहा फुटबॉलपटूंसह खेळावे लागले.
जमशेदपूर एफसीने सलग पाचवा विजय नोंदवला. तसेच १८ सामन्यांतील विजयांची संख्या ११वर नेली. यंदाच्या हंगामात सर्वाधिक विजय मिळवण्याचा मानही त्यांनाच जातो. जबरदस्त फॉर्म राखलेल्या जमशेदपूरची गुणसंख्या आता ३७वर गेली. अजून त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे सातत्य राखल्यास आठव्या हंगामात गुणांची चाळीशीपार करण्याची त्यांना संधी आहे. हैदराबादने यापूर्वीच प्ले-ऑफ फेरी निश्चित केली आहे. मात्र, जमशेदपूरने त्यांची विजयी मालिका खंडित केली. तसेच सलग चौथ्या विजयापासून रोखले. हैदराबादचा १९ सामन्यांतील हा केवळ चौथा पराभव आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या या क्लबच्या खात्यात ३५ गुण आहेत.
निकाल : जमशेदपूर एफसी ३(चिंग्लेन्सना सिंग स्वयंगोल, पाचव्या मिनिटाला, पीटर हार्टली २८व्या मिनिटाला, डॅनियल चिमा चुक्वु ६५व्या मिनिटाला) वि. हैदराबाद एफसी ०.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रीडाविश्वातूनही रशियाची कोंडी! फिफासह ऑलिम्पिक संघटनेने केली कडक कारवाई
आयएसएल: मोहन बागान विजयी ट्रॅकवर; प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम
आयएसएल: ईस्ट बंगालसह नॉर्थ ईस्ट युनायटेडमध्ये शेवटचे स्थान टाळण्यासाठी स्पर्धा