---Advertisement---

केकेआरचा खोडसाळपणा! विजेतेपदाच्या ॲनिव्हर्सरी पोस्टमधून श्रेयस अय्यरला केलं गायब!

---Advertisement---

सध्या सुरू असलेला आयपीएल 18 वा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. (IPL Season 18) यावेळी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दमदार कामगिरी केली आहे. (Shreyas Iyer Captain Punjab Kings) दरम्यान गेल्या वर्षी आज (26 मे) कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादचा धुव्वा उडवत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. (KKR won the title last year under the leadership of Shreyas Iyer)

यादरम्यान केकेआरने गतवर्षी जिंकलेल्या या ट्राॅफीचा आनंद साजरा करण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पण यादरम्यान केकेआरने लाजिरवाणे कृत्य केलं आहे. या विजेतेपदाच्या ॲनिव्हर्सरी पोस्टमधून केकेआरने संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरलाच वगळले आहे. (Champion Shreyas Iyer omitted from title anniversary post)

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2024 च्या आयपीएल ट्राॅफीवर आपले नाव कोरले होते. पण तरीही 2025च्या आयपीएल हंगामासाठी केकेआरने त्याला आपल्या संघात कायम ठेवले नाही. त्यानंतर 2025 साठीच्या झालेल्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला 26.75 कोटींना आपल्या ताफ्यात सामील केले. त्याच वेळी संघाने त्याला कर्णधारपदाची सूत्रे देखील सोपवली. (Punjab Kings buy Shreyas Iyer in auction)

यंदाच्या आयपीएल हंगामात श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाबची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. संघ 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. पंजाबने जवळजवळ 14 वर्षांनी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. संघाने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 13 सामन्यात 8 विजय मिळवले, तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि 1 सामना बरोबरीच सुटला. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---