नुकताच ऑस्ट्रेलियन संघाचा भारत दौरा पार पडला. दिग्गज डेवड वॉर्नर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला आणि दुखापतीच्या कारणास्तव अर्ध्यातून मायदेशात परतला. जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने सामने असणार आहेत. पण वॉर्नरला डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळेल, असे सध्या तरी दिसत नाहीये.
जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 7 जून रोजी इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर सुरू होणार आहे. मागच्या महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली गेली. भारताने मायदेशातील ही मालिका 2-1 अशा अंतराने नावावर केली. मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही संघ डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. उभय संघांना डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळताना पाहण्याासठी जगभरातील चाहते उत्सुक आहेत. डेविड वॉर्नर (David Warner) याला या सामन्यात पाहण्यासाठीही चाहते वाट पाहत आहेत, पण वॉर्नरच्या या सर्व चाहत्यांची निराशा होऊ शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात वॉर्नरला संधी मिळणार नाहीये. मॅट रेनशॉ आणि मार्कस हॅरिस यांना सलामीवीर म्हणून 18 सदस्यीय संघात सामील केले जाऊ शकते. बुधवारी (19 एप्रिल) क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून हा संघ घोषित केला जाऊ शकतो. वृत्तांनुसार वॉर्नरला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात वगळलल्यानंतर ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येच संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर यांच्या मते वॉर्नरला या तीन कसोटी सामन्यांमध्ये नक्कीच संधी दिली पाहिजे. त्यानंतर सलामीवीर म्हणून ऍशेसच्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये मॅट रेनशॉ किंवा कॅमरून बेनक्रॉफ्टला आजमावले जाऊ शकते.
दरम्यान, वॉर्नरने भारताविरद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत केवळ तीन वेळा फलंदाजी केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि नंतर तो मायदेशात परतला. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने 1, 10 आणि 15 धावांची खेळी केली. तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर चौथा सामना अनिर्णित राहिला. वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत 103 कसोटी सामन्यातील 187 डावांमध्ये 46च्या सरासरीने 8158 धावा केल्या आहेत. यात 25 शतक आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने कसोटीत 335* धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. सध्या आयपीएलमध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, पण पहिल्याच पाचही सामन्यात त्याच्या नेतृत्वातील दिल्ली संघ पराभूत झाला आहे.
भारतीय संघाचा विचार केला, तर यावर्षी संघ दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. डब्ल्यूटीसीच्या पहिल्या हंगामात भारत आणि न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यात आमने सामने होते. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत करून पहिल्या डब्ल्यूटीसी ट्रॉफीचा मानकरी ठरला होता. डब्ल्यूटीसी ट्रॉफी जिंकाण्यासाठी यावर्षी भारताकडे दुसऱ्यांदा संधी आहे. (It is being said that David Warner will not get a chance in WTC Fine)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नो-बॉलचा मारा करताच पंचांनी हर्षलला गोलंदाजी करण्यापासून का रोखले? ‘हे’ आहे कारण
आयपीएल 2023मधून मोठी बातमी! LSG vs CSK सामन्याच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या कारण