बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडलेल्या पहिल्या आणि ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि २६२ धावांनी विजय मिळवला.
१४ जूनपासून सुरु झालेल्या या सामन्याचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागला. १५ जूनला म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २४ फलंदाज बाद झाले. ११६ वर्षांनंतर म्हणजे १९०२ सालानंतर पहिल्यांदाच सामन्याच्या एकाच दिवशी २४ किंवा त्यापेक्षा जास्त फलंदाज बाद झाले आहेत.
यात भारताचे ४ तर अफगाणिस्ताचे २० फलंदाज बाद झाले. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी त्यांचा पहिला डाव ६ बाद ३४७ धावांवरून सुरु केला. त्यानंतर भारताच्या उर्वरित ४ विकेट पडल्याने भारताचा डाव ४७४ धावांवर संपुष्टात आला.
यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानला त्यांच्या पहिल्या डावात २७.५ षटकात सर्वबाद १०९च धावा करता आल्याने भारताने त्यांना फॉलोआॅन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला त्यांचा खेळ सुधारता न आल्याने हा डावही ३८.४ षटकात १०३ धावांवर संपुष्टात आला.
अशा रितीने पूर्ण दिवसभरात या सामन्यात एकूण २४ विकेट गेल्या.
याबरोबरच भारताने पहिल्यांदाच दोन दिवसात सामना जिंकण्याचा कारनामा देखील केला.
Most wkts in a day's play:
27 Eng v Aus, Lord's, 1888 (Day 2)
25 Aus v Eng, MCG, 1902 (Day 1)
24 Eng v Aus, Oval, 1896 (Day 2)
24 Ind v Afg, Bengaluru, 2018 (Day 2) – the most in a day's play in 116 years#INDvAFG— Deepu Narayanan (@deeputalks) June 15, 2018