पुणे। बॅडमिंटन खेळाच्या जन्माचे १५० आणि पुणे जिल्हा महानगर बॅडमिंटन संघटनेचे ७५ वे वर्षे साजरे करत असतानाच भारतीय पुरुष संघाचे विजेतेपद हा सगळा दुर्मिळ योगायोगच आहे. या सगळ्याचा एकत्रित आनंद साजरा करताना मी कलमालीचा प्रेरित झालो असून, या निमित्ताने प्रकाशित झालेल्या दि पूना गेम या कॉफी टेबल बुकने मला जुन्या आठवणीत नेऊन ठेवले आहे. हे कॉफी टेबल बुक नुसते पुस्तक नाही, तर बॅडमिंटन खेळाच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा समग्र इतिहास आहे. अशा शब्दात भारताचा माजी बॅडमिंटनपटू, प्रशिक्षक आणि सध्याचा भारतीय बॅडमिंटन महासंघाचा उपाध्यक्ष पी, गोपीचंद याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुण्यात जन्म झालेल्या बॅडमिंटन खेळाची १५० आणि त्यानंतर नि्र्माण झालेल्या पीडीएमबीएची ७५ वर्षे असा दुहेरी आनंद साजरा करण्यासाठी रेसिडन्सी क्लबवर अवघा बॅडमिंटन परिवार एकत्र आला होता. पीडीएमबीएच्या वतीने या दुहेरी उपलब्धीचा आनंद साजरा करण्यासाठी दि पूना गेम या नावाने कॉफी बुक टेबलची निर्मीती करण्यात आली. त्याचे प्रकाशन आज गेपीचंद आणि बॅडमिंटन संघटनेचे सचिव संजय मिश्रा यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. प्रकृती बरी नसल्याने दोघेही या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय समितीचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
आज बॅडमिंटन जगभरात एक लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जात आहे. भारताचे नावही या खेळात प्राधान्याने घेतले जाते. थॉमस करंडक स्पर्धेतील पदकाने हे ही सिद्ध झाले. अशा या अटकेपार झेंडे लावलेल्या खेळाचा जन्म पुण्यात झाला आणि त्याचे नियम १८७१-७२च्या काळात पुण्यातच बनविण्यात आले याचा अभिमान वाटतो. या खेळाच्या निर्मितीनंतर १९४६ मध्ये येथेच पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेची स्थापना झाली. तेव्हापासून ७५ वर्षे ही संघटना समर्थपणे बॅडमिंटनची सेवा करत आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यात या संघटनेचा मोठा वाटा आहे. तो कधीच विसरता येणार नाही. जसे दर्जेदार खेळाडू पीडीएमबीएने घडवले, तसेच कुशल संघटक आणि पंचही पीडीएमबीएने बॅडमिंटनला दिले आहेत. आज संपूर्ण भारतातील एकूण पंचाच्या दहा टक्के पंच हे पुण्यात आहेत, अशा शब्दात पीडीएमबीएचे सचिव रणजित नातू यांनी संघटनेच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला.
दि पूना गेमपासून सुरू झालेल्या या अस्सल पुणेरी खेळाचा प्रवास बॅडमिंटनपर्यंत येऊन थांबला आहे. हा सगळा प्रवासच या कॉफी टेबल बुक पुस्तकातून मांडण्यात आला आहे. खेळाच जन्म झाला तेव्हा त्याची ओळख दि पूना गेम अशी होती. त्यामुळे त्याच नावाने आम्ही पुस्तक काढल्याचे नातू यांनी सांगितले.
या निमित्ताने दिवंगत संघटक अविनाश वाडदेकर, दाजीसाहेब नातू, सुरेश पळणीकर, संघटनेच्या माध्यमातून नावारुपाला आलेल खेळाडू मंजुषा पावनगडकर, निखिल कानेटकर आणि मंजुषा सहस्त्रबुद्धे, प्रशिक्षक के.आर. शेट्टी, अनिल मोडक, पंच गिरीश नातू, कर्मचारी दिलीप कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
आभासी पद्धतीनेच या कार्यक्रमाता बोलताना गोपीचंद यांनी बॅडमिंटन आणि पुणे तसेच गोपीचंद आणि पुणे यांचे नाते उलगडून दाखवले. या खेळात एक खेळाडू म्हणून मी जोडला गेलो हा मी माझा सन्मान मानतो. भारताच्या पहिल्या थॉमस करंडक स्पर्धेच्या विजेतेपदाची आठवण अगदीच ताजी असताना या कॉफी टेबल बुकमुळे सर्वांना जुन्या आठवणीत नेऊन ठेवले. हे पुस्तक नाही, तर बॅडमिंटनच्या प्रवासाचा समग्र इतिहास आहे असे म्हटले तरी चालेल, असे गोपीचंद म्हणाले.
कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून पुणे जिल्हा महानगर बॅडमिंटन संघटनेने बॅडमिंटनचा सगळा प्रवास एकत्र संकलित करण्याचे मोठे काम केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याबरोबरच बॅडमिंटनच्या प्रसारात त्यांचे कार्य महत्वाचे आहे. त्यांनी केवळ खेळाडूच नाही, तर कोर्ट ऑफिशियलही घडवले. बॅडमिंटनच्या प्रसार आणि विस्तारात पीडीएमबीएला विसरून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
माझ्या कारकिर्दीत पुणे शहराला विशेष महत्व आहे. या शहराबरोबर माझ्या काही गोड आठवणी जोडल्या आहेत. हेच ते शहर आहे की जेथे १९९५ मध्ये दुखापतीमुळे माझी कारकिर्द जवळपास थांबली होती. पण, त्यानंतर दोनच वर्षांनी १९९७ मध्ये मी येथेच माझे पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळविले. त्याचबरेबर नातू कुटुंबिय आणि रणजीत नातू यांच्याशी असलेले अतूट नातेही मला विसरता येणार नाही. रणजित माझा चांगला मित्र असून एकेकाळचा माझा दुहेरीतील जोडीदार होता. त्याच्यासाथीत अनेक राष्ट्रीय मानांकन स्पर्धा जिंकल्याची आठवणही गोपीचंदने या वेळी सांगितली.
महत्त्वाच्या बातम्या –
सेहवाग का करायचा आक्रमक फलंदाजी? सचिन, द्रविड, लक्ष्मण होते मुख्य कारण
मोठी बातमी! भारताची सुवर्ण इतिहासाला गवसणी, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’
एकच नंबर! भारताची ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कपच्या फायनलमध्ये एन्ट्री, वाचा कामगिरी