दुबई। आयपीएल २०२० मध्ये सोमवारी (५ ऑक्टोबर) अबू धाबी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू आर अश्विनची खिलाडूवृत्ती पाहायला मिळाली. त्याने या सामन्यात बेंगलोरचा फलंदाज ऍरॉन फिंचला मंकडींगने बाद केले नाही. तरीही, त्याने ट्वीट करत ही आपली या वर्षाची पहिली आणि अंतिम चेतावणी असल्याचे सांगितले. यानंतर मंकडींग करणे बरोबर की चूक यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
यामध्ये माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर निशाना साधला आहे. २०१९ मध्ये अश्विनने जॉस बटलरला मंकडींगमार्फत बाद केले होते. त्यानंतर खूप वाद झाला होता.
‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर राग व्यक्त केला. सोबतच इतिहासातील घडलेली आणखी एक घटना सिद्ध केली. खरं तर १९४७ मध्ये वीनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊन या फलंदाजाला अशाप्रकारे बाद केले होते. त्यानंतर आता २०२० मध्ये आयपीएलच्या सामन्यात अश्विनने फिंचला जीवदान दिले आहे. यावर बोलताना गावसकरांनी म्हटले आहे की, “या (मंकडींग) गोष्टीला कशावरून खेळभावना म्हटले जात आहे?, जी एक पौराणिक आहे.”
ते पुढे बोलताना म्हणाले, “हे अगदी त्याप्रकारचे आहे, ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू म्हणतात ते कधीच क्रीझ ओलांडत नाहीत. कोणालाच माहिती नाही की ती रेषा कुठे आहे. गोलंदाजी एन्डवर असणाऱ्या फलंदाजाला क्रीझवरून बाहेर का जाऊ द्यावे (जो चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर येऊन चूकीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे).

क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला लगेच मिळते शिक्षा
क्षेत्ररक्षणाच्या नियमांबद्दल बोलताना गावसकर म्हणाले, “क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठीही नियम बनवण्यात आले आहेत. पावरप्लेमध्ये ३० यार्डाच्या बाहेर कमीत कमी खेळाडूकडून एक इंचही बाहेर निघाल्यावर चेंडू ‘नो बॉल’ ठरवला जातो. मला यामध्ये काही समस्या नाही. जर फलंदाज नॉन स्ट्रायकर एन्डवर असे करणार असेल, तर ते योग्य कसे काय? आजच्या तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे की त्यामुळे मैदानावर होणारी प्रत्येक लहान घटना चटकन पकडली जाते.
७३ वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू शिकले नाही
गावसकरांनी अश्विन आणि फिंचमध्ये झालेल्या घटनेला उजाळा देत म्हटले की, “फिंचबाबत जर बोलायचं झालं, तर अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच फिंच एक किंवा दीड मीटर क्रीझच्या बाहेर पडला होता. यावरून अंदाज लावा की नॉन स्ट्रायकर एन्डवर फलंदाज किती चूकीचा फायदा घेत आहे. हे पाहता माझ्या लक्षात जी गोष्ट आली होती ती म्हणजे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू केव्हा शिकणार? १९५७ मध्ये बिल ब्राऊन होते आणि आता फिंच. हा नियम आहे की गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटल्यानंतर फलंदाजाला क्रीझच्या बाहेर जायचे आहे. नियम स्पष्ट आणि सामान्य आहे.”






