भारतासह संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशामध्ये क्रिकेटपटू सोशल मीडियामार्फत चाहत्यांशी संवाद साधत आहेत. नुकतेच पाकिस्तानची प्रसिद्ध टी.व्ही. स्पोर्ट्स अँकर झैनब अब्बास आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यात इंस्टाग्राम लाईव्ह चॅट झाले होते.
यादरम्यान अख्तरने (Shoaib Akhtar) भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) जखमी करण्यासाठी तयार केलेल्या रणनीतीचा (Plan) खुलासा केला.
या लाईव्ह चॅटमध्ये अख्तर म्हणाला की, गंभीरला जखमी करण्याची रणनीती माझी नव्हती. ही रणनीती पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार वसीम अकरमची (Wasim Akram) होती.
गांगुलीला शॉर्ट चेंडू टाकून त्याला बाद करणे, ही आमची रणनीती असायची. कारण गांगुली शॉर्ट चेंडूवर चांगल्याप्रकारे खेळत नव्हता. तसेच पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होत होता किंवा मग जखमी होत होता, असेही अख्तर यावेळी म्हणाला.
अख्तरने पुढे सांगितले की, “पाकिस्तान संघाचे गोलंदाज गांगुलीच्या पायावर चेंडू टाकत होते. तसेच एका खेळाडूला आम्ही शॉर्ट लेगजवळ उभे करत होतो. जेणेकरून तो आम्हाला झेल देऊन बाद होईल. अशा प्रकारची आमची रणनीती होती.”
“आम्ही या रणनीतीचा वापर मोहालीपासून शारजाहपर्यंत केला. अशाच पद्धतीने आम्ही त्याला बाद करत होतो. यादरम्यान तो एक-दोन वेळा जखमी झाला होता. परंतु ही रणनीती अकरमने बनवली होती,” असेही अख्तर यावेळी म्हणाला.
गांगुलीबद्दल बोलताना अख्तर म्हणाला की, “मैदानावर आम्ही कितीही खतरनाक क्रिकेट खेळलो तरीही मैदानाबाहेर आम्ही चांगले मित्र होतो. तसेच कधीकधी एकमेकांना डिनरलाही भेटत होतो.”
“गांगुलीने त्यावेळी मला सांगितले होते की, तू सारखा सारखा चेंडू पायावरच का टाकतोय. केव्हातरी पायाच्या खाली टाकत जा,” असेही अख्तर यावेळी म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमधील त्या ३ तासांनी मॅक्क्युलम व आयपीएलचे बदलले जग
-मला त्याने सी ग्रेड कलाकार म्हटलं, त्यामुळे परत मैत्री झालीच नाही
-पाहता पाहता १२ वर्ष झाली, आयपीएल सुरु झाली होती याच दिवशी १२ वर्षांपुर्वी