---Advertisement---

याला म्हणतात धमाकेदार पदार्पण! हंगामातील पहिल्याच चेंडूवर ‘या’ गोलंदाजाने घेतली विकेट

On: मंगळवार, ऑगस्ट 3, 2021 4:20 PM
---Advertisement---

‘द हंड्रेड’ लीगमध्ये झालेल्या १६ व्या सामन्यात ओव्हल इन्विजीबल आणि वेल्शफायर संघ आमनेसामने होते. वेल्सफायरने प्रथम फलंदाजी करताना ओव्हल इन्विजीबल्सला १०० चेंडूंमध्ये १२२ धावांचे आव्हान दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना ओव्हल इन्विजीबल्सच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि जेसन रॉय केवळ ८ धावा करून बाद झाला.

२७ वर्षीय मॅथ्यू मिल्नेसला षटकार ठोकण्याच्या गोंधळात रॉयने चेंडू उंच हवेत मारला आणि बेन डकेटने सहजच चेंडू झेलला (कॅच) आणि आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिले. मिल्नेसचा हा या सामन्यातीलच नव्हे तर या स्पर्धेतला हा पहिला बॉल होता आणि त्याने कदाचित अशा पदार्पणाचा विचार देखील केला नसेल.

जेसन रॉयने बाहेर पडण्यापूर्वी दोन खणखणीत चौकार मारले होते आणि ते नेत्रदिपक होते. मात्र, मिल्नेसने पहिल्याच चेंडूवर त्याला बाद करून शानदार सुरुवात केली. त्याचवेळी, रॉयच्या दृष्टिकोनातून ही त्याची सलग दुसरी खराब कामगिरी होती.

ओव्हलचा कर्णधार सॅम बिलिंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा निर्णय योग्य देखील ठरला. त्याच्या संघाकडून वेगवान गोलंदाज रीस टोपलेने एकाच षटकारात दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवत सामना आपल्या बाजूने केला होता. तसेच फलंदाजी करताना सॅम बिलिंग्जने नाबाद ४० धावा करत संघाला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला होता.

जेसन रॉयचे क्रिकेटमध्ये असे झाले पदार्पण
जेसन रॉय याचा जन्म दक्षिण आफ्रिकेच्या डरबन शहरात झाला होता. मात्र, त्याने आफ्रिकेऐवजी इंग्लंड क्रिकेट संघाकडून खेळणे पसंत केले. त्याने ८ मे २०१५ रोजी आयर्लंड संघाविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर, ७ सप्टेंबर २०१४ रोजी भारताविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. फलंदाजी व्यतिरिक्त रॉय गोलंदाजी देखील करतो. तो उजव्या हाताने मध्यम वेगाने गोलंदाजी करतो.

जेसन हा दहा वर्षाचा असताना आपल्या कुटुंबासमवेत इंग्लंडमध्ये आला होता. त्यानंतर तो इंग्लंमध्येच राहिला. दरम्यान, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तो सर्रेकडून खेळत असताना त्याने चांगली कामगिरी बजावली होती. त्यामुळे इंग्लंडच्या संघात जेसन रॉयला संधी देण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

अगग… स्ट्राईकवरील फलंदाजानेच नॉन स्ट्राईकवरील जोडीदाराला केले ‘रनआऊट’! बघा व्हिडिओ

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! लवकरच सुरू होतेय आयपीएलसारखी मोठी टी२० टूर्नामेंट, जाणून घ्या त्याबद्दल

क्रिकेटसाठी सोडला भारत, अमेरिकेच्या संघाचा बनला कर्णधार; आता पहिल्याच सामन्यात चोपल्या नाबाद ९९ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---