ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 डिसेंबरपासून सुरू होणार्या कसोटी मालिकेतील चारपैकी तीन कसोटी सामन्यांत भारताचा संघ नियमित कर्णधार विराट कोहली शिवाय खेळणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिका आणि पहिली कसोटी खेळल्यानंतर कोहली भारतात परतेल. हा केवळ भारतीय संघासाठीच नव्हे तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीही(कसोटी मालिका) हा मोठा धक्का आहे, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने केले आहे.
फॉक्स स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार लायन म्हणाला, ‘अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराकडे पाहा आणि भारताकडे काही युवा क्रिकेटपटूही आहे. आमच्यासाठी हे एक मोठे आव्हान आहे. फक्त विराट नसल्यामुळे आम्ही ट्रॉफी जिंकू असे नाही. आम्हाला बरीच मेहनत आणि अभ्यास करावा लागणार आहे.’
२०१८-१९ च्या हंगामात भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियासाठी पुजारा सर्वात मोठा अडथळा बनला होता. चार सामन्यात पुजाराने 521 धावा जमवल्या आणि त्यात तीन शतकेही होती. तसेच मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो होता. त्यानंतर कोहलीच्या 282 धावा होत्या.
विराट खेळणार नसल्याची खंत –
विराट कोहली जानेवारीमध्ये पहिल्यांदाच वडील बनणार असल्याने त्याने पालकत्व रजा घेतली आहे. त्याच कारणामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी खेळल्यानंतर भारतात परतणार आहे. याबद्दल बोलताना लायनने विराट विरुद्ध यंदा अधिक काळ खेळता न येण्याबद्दल खंत व्यक्त केली.
“कोहली मालिकेत नसणे ही या मालिकेतील निराशाजनक बाब आहे. तुम्हाला जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरूद्ध खेळायचे असते,” असे लायन म्हणाला.
तसेच लायन पुढे म्हणाला, “माझा विश्वास आहे की स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशानेसह विराट जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. तो मालिकेत नसणे हे निराशाजनक आहे, परंतु तरीही भारताकडे सुपरस्टार्स आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या –
संघ महत्त्वाचा की कुंटुंब? विराटने पालकत्व रजा घेतल्याने चाहत्यांमध्ये पडले दोन गट
“…त्यामुळे भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिका सहज जिंकेल”, माजी कर्णधाराची भविष्यवाणी
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंना विशेष सुविधा, विराट कोहलीसाठी खास पेंटहाउस
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर