भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या(MS Dhoni) निवृत्तीबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. त्याच्या निवृत्तीबद्दल अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी विविध मते मांडली आहेत.
आता धोनीचा माजी संघसहकारी युवराज सिंगने(Yuvraj Singh) म्हटले आहे की निवृत्तीच्या चर्चा धोनीसाठी अयोग्य आहेत. धोनीने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे.
धोनीच्या निवृत्तीबद्दल युवराज एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, ‘मला वाटते धोनीसाठी हे अयोग्य आहे. धोनीने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळे तूम्ही त्याला वेळ दिला पाहिजे.’
‘कधी निवृत्ती(Retirement) घ्यायची हे त्यालाच ठरवू द्या. त्याने तो निर्णय घ्यायची गरज आहे. जर त्याला अजून खेळायचे असेल तर तो त्याचा निर्णय आहे आणि आपण त्याचा सन्मान केला पाहिजे.’
त्याचबरोबर धोनी आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतमध्ये(Rishabh Pant) होणाऱ्या तुलनेबद्दल युवराज म्हणाला, ‘एमएस धोनी एका दिवसात बनला नाही. त्यासाठी त्याला काही वर्षे लागली. त्यामुळे त्याची जागा घेण्यासाठीही नवीन खेळाडूला काही वर्षे लागतील. टी20 विश्वचषकासाठी अजून एक वर्ष आहे त्यामुळे अजून पुरेसा वेळ आहे.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–बरोबर एकवर्षांपूर्वी ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ते अधूरे स्वप्न झाले होते पूर्ण…
–या खेळाडूंकडून भारतीय क्रिकेटपटूंना मिळते फिटनेससाठी प्रेरणा, कोहलीने केला खूलासा
–…म्हणून ‘कॅप्टनकूल’ धोनीला आठवले शाळेचे दिवस, पहा व्हिडिओ