भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या मालिकेसाठी काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी काही नवीन आणि युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय फलंदाज मयंक अग्रवाल राष्ट्रीय संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक आहे. भारत ‘अ’ संघाकडून खेळताना त्याला राहुल द्रविड यांच्यासोबत एक अद्भुत अनुभव आला होता. याबाबत त्याने एक किस्सा सांगितला आहे.
मयंक अग्रवालला विचारण्यात आले की त्याला द्रविडशी खेळाबाबत कोणत्या गोष्टींवर चर्चा करायची आहे. तो म्हणाला की, ‘काही मुद्दे आहेत ज्यावर मला त्यांच्याशी बोलायचे आहे. त्यांच्याशी संवाद साधणे खूप सोपे असते. आत्ताच नाही तर जेव्हा आम्ही भारत ‘अ’ चा भाग होतो, तेव्हाही आम्ही फोनवर त्यांच्याशी थेट बोलू शकत होतो आणि आमच्या मनातील गोष्टी सांगू शकत होतो.’ आतापर्यंत १४ कसोटी सामन्यांमध्ये १०५२ धावा करणाऱ्या सलामीवीर मयांक अग्रवालचे लक्ष न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर आहे.
या मालिकेतील पहिला सामना कानपूर आणि दुसरा सामना मुंबईत होणार आहे. तो म्हणाला की, ‘मी न्यूझीलंडविरुद्धच्या संघाचा भाग बनण्यास उत्सुक आहे. आयपीएलमध्ये मी ज्याप्रकारे कामगिरी केली त्यामुळे मी खूश आहे. संघाच्या गरजेनुसार मी माझी भूमिका बजावली. मी सुरुवातीला आक्रमक खेळ केला आणि गरज पडल्यास तेव्हा संयमाने देखील खेळ खेळला.’
न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वांद्रे कुर्ला संकुलात एक छोटे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात वेगवान गोलंदाज इंशात शर्माने नेटमध्ये जोरदार सराव केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणेने तर दुसऱ्या दिवशी इशांत आणि जयंत यादव यांनी जोरदार सराव केला.
महत्त्वाच्या बातम्या-
एकवेळी ४ वर्षे टी२० संघातून बाहेर राहिलेल्या अश्विनचे न्यूझीलंडविरुद्ध विशेष ‘अर्धशतक’
बांगलादेशात सराव सत्रादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी फडकवला आपला राष्ट्रध्वज, उफळला नवा विवाद