विशाखापट्टण कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडला 106 धावांनी मात दिली. शेवटच्या डावात विजयासाठी इंग्लंडला 399 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे पाहुणा संघ 69.2 षटकांमध्ये 292 धावा करून सर्वबाद झाला. जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. श्रेयस अय्यर याने सोमवारी (5 फेब्रुवारी) श्रेत्ररक्षणाचा उत्तम नमुना सादर केला.
इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेर एका विकेटच्या नुकसानावर 67 धावा केल्या होत्या. सामन्याच्या चौथ्या दिवशी 332 धावा होव्या होत्या आणि 9 विकेट्स देखील बाकी होत्या. असे असले तरी, भारतीय गोलंदाजांनी चौथ्या दिवसाच्या चहापाणाआधी अख्का इंग्लंड संघ तंबूत धाडला. जॉनी बेअरस्टो याने 43व्या षटकात विकेटग गमावली. इंग्लंडसाठी हा सहावा झटका होता. पण त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स (Ben Foakes) संघासाठी मोठी भागीदारी करतील, अशी चाहत्यांना अपेक्षा होती.
स्टोक्स मोठी खेळी करण्याच्या मानसिकतेनेच खेळपट्टीवर आला होता. पण शेवटच्या डावातील 53व्या षटकात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने जबरदस्त थ्रो करून त्याला तंबूत धाडले. यावेळ रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत होता. बेन फोक्स याने सिंगल घेण्यासाठी प्रयत्न केला. स्टोक्सला देखील ही धाव सहजासहजी पूर्ण करता येईल, असा भास झाला. यामुळेच इंग्लिश कर्णधार खेळपट्टीवर निवांत धावत होता. पण याच संधीचा फायदा उचलत मीड विकेटवर उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने चपळाई दाखवली आणि स्ट्रईकर एंडवर डायरेक्ट हिड केला. स्टोक्सची बॅठ अवघे काही इंच क्रिजच्या बाहेर असल्यामुळे त्याने विकेट गमावली.
What a throw by Shreyas Iyer. 🔥🫡pic.twitter.com/saweZmuMhP
— Johns. (@CricCrazyJohns) February 5, 2024
तत्पूर्वी भारतीय संघाने पहिल्या डावात 396, तर इंग्लंडने 253 धावा केल्या होत्या. धुसऱ्या डावात भारताने 255 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य मिळाले. यशस्वी जयस्वालने या सामन्यात 209 धावांची (पहिल्या डावात) सर्वोत्तम खेळी केली. तर जसप्रीत बुमराह याने 6 आणि 3 विके्स घेतल्या. शुबमन गिल पहिल्या डावात स्वस्तात बाद झाला, पण दुसऱ्या डावात त्यानेही शतक ठोकले. (Iyer Iyer direct hit and Ben Stokes was run out)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । इंग्लंडच्या पराभवानंतर यॉर्करबाबत बोलला बुमराह, रोहित शर्माचाही केला उल्लेख
IND vs ENG । विजयानंतर भारत फूल कॅन्फिडेंसमध्ये! तिसऱ्या कसोटीआधी रोहितचे मोठे विधान