पुणे । ग्रीनबॉक्स यांच्या तर्फे आयोजित ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत एन पेटिट स्कुल ब , जेएन पेटिट स्कुल अ, बिशप्स कल्याणीनगर व स्प्रिंग डेल स्कुल ब या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
कॅस्टल रॉयल, एबीआयएल कॅम्पस, रेंजहिल्स, भोसलेनगर येथील फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत कौशल भांडारकर दोन गोलांच्या जोरावर जेएन पेटिट स्कुल ब संघाने इंदिरा नॅशनल स्कुल संघाचा 4-2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
दुस-या लढतीत जयेश उमरधनच्या हॉट्रीक कामगिरीच्या जोरावर जेएन पेटिट स्कुल अ संघाने एचईएम गुरुकुल स्कुल संघावर 5-1 असा एकतर्फी विजय मिळवला.
अस्मय गायकवाडच्या हॉट्रीक कामगिरीसह स्प्रिंग डेल स्कुल ब संघाने सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल संघाचा 3-1 असा पराभव केला.
अगस्त्य पाटणकरच्या दमदार हॉट्रीक कामगिरीच्या जोरावर बिशप्स कल्याणीनगर संघाने दस्तूर हायस्कुल संघाचा 10-0 असा दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. ओरायन मॅथ्यू, वेदांत शंकर यांनी प्रत्येकी दोन तर एकलव्य ब्राम्हनीय व शौर्य चव्हाण यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला मोठा विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
जेएन पेटिट स्कुल ब – 4(कौशल भांडारकर 3,16मि., यशधन वाडीया 14 मि, फरझन सेठना 22मि) वि.वि इंदिरा नॅशनल स्कुल-2(आरव साबळे 13मि, निहार कुचनकर 19 मि)
जेएन पेटिट स्कुल अ -5(रोहन उत्तेकर 4 मि, प्रतिक गायकवड 9 मि , जयेश उमरधन 18,20,23 मि) वि.वि एचईएम गुरुकुल स्कुल – 1(श्रेय किशोरे 22 मि)
बिशप्स कल्याणीनगर- 10(अगस्त्य पाटणकर 2,4,6 मि, जसवीर सिंग 7 मि, ओरायन मॅथ्यू 8,10 मि, वेदांत शंकर 11, 13 मि, एकलव्य ब्राम्हनीय 15 मि, शौर्य चव्हाण 18 मि) वि.वि दस्तूर हायस्कुल- 0
स्प्रिंग डेल स्कुल ब-3(अस्मय गायकवाड 3,8,18 मि ) वि.वि सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल – 1(शेरीयर माझदा 20 मि)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक
–जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी
–लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते