अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) तिसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या दिवस-रात्र सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान भारतीय संघाचे वर्चस्व दिसून आले. भारताच्या गोलंदाजांनी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडला ११२ धावांवर गारद केले. त्यानंतर दिवसाखेर ३ बाद ९९ धावा केल्या.
मात्र दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच पाहुण्या इंग्लंडने भारताला एका-नंतर-एक धक्के दिले. त्यातही इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीच याच्यासाठी सलामीवीर रोहित शर्माची विकेट अतिशय महत्त्वपुर्ण ठरली.
पहिल्या दिवशी विस्फोटक फलंदाज रोहितने ८२ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही त्याच्याकडून मोठ्या आकडी धावसंख्येची अपेक्षा होती. परंतु लीचने डावातील ४०.१ षटकात रोहितला पायचित केले. त्यामुळे ९६ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ६६ धावा करत रोहित पव्हेलियनला परतला.
विशेष म्हणजे, लीचने या कसोटी मालिकेत रोहितला बाद करण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापुर्वी त्याने तब्बल ३ वेळा रोहितला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात त्याने रोहितला बाद केले होते. तर पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावातही रोहितला त्यानेच तंबूचा रस्ता दाखवला होता. रोहितव्यतिरिक्त श्रीलंकाचा कुशल मेंडिस हादेखील एका कसोटी मालिकेत लीचची सर्वाधिक वेळा शिकार बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG 3rd Test Live: भारताला जबर फटका; रोहित पाठोपाठ पंतही बाद; ४४ ओव्हरमध्ये भारताच्या ६ बाद १२१ धावा
एकचं नंबर भावा! पृथ्वी शॉचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, विजय हजारे ट्रॉफीत शतकानंतर झुंजार द्विशतक