---Advertisement---

INDvsENG 4th Test: पंतचे शतक, सुंदरचे अर्धशतक; दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या ७ बाद २९४ धावा; भारताकडे ८९ धावांची आघाडी

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज (०५ मार्च) दुसरा आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारताने ९४ षटकात ७ बाद २९४ धावा केल्या आहेत. सध्या वॉशिंग्टन सुदंर ११७ चेंडूत ६० धावांवर आणि अक्षर पटेल ३४ चेंडूत ११ धावांवर नाबाद आहे. तसेच भारताने ८९ धावांची आघाडी घेतली आहे. रिषभ पंतने या डावात शतकी खेळी केली आहे.

रिषभ शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच जेम्स अँडरसनच्या चेंडूवर बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि २ षटकार मारले. तो बाद झाल्यानंतरही सुंदरने अक्षरला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला. दरम्यान, त्यानेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले.

पंतचे शतक

पंतने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या सत्रात धावांचा वेग वाढवत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने ८३ व्या षटकात जेम्स अँडरसनला पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्विपचा फटका मारत चौकार मारत नव्वदीत प्रवेश केला होता. अखेर ८४ व्या षटकात त्याने जो रुट विरुद्ध षटकार मारत त्याचे कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले.

त्याला दुसऱ्या बाजूने वॉशिंग्टन सुंदरने भक्कम साथ दिली असून या दोघांमध्ये ७ व्या विकेटसाठी शतकी भागीदारीही झाली आहे.

सध्या भारताने पहिल्या डावात ८४ षटकात ६ बाद २५९ धावा केल्या आहेत. भारताकडून सध्या रिषभ पंत ११७ चेंडूत १०१ धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर ९२ चेंडूत ४० धावेवर नाबाद खेळत आहेत. तसेच भारत सध्या ५४ धावांनी आघाडीवर आहे.

पंतचे अर्धशतक 

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर रिषभने एक बाजू सांभाळली असून त्याने ७२ व्या षटकात ८२ चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील ७ वे अर्धशतक आहे. त्याला दुसऱ्या बाजूने वॉशिंग्टन सुंदरने चांगली साथ दिली आहे.

सध्या भारताने पहिल्या डावात ७४ षटकात ६ बाद १९५ धावा केल्या आहेत. भारताकडून सध्या रिषभ पंत ८८ चेंडूत ५५ धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर ६० चेंडूत २३ धावेवर नाबाद खेळत आहेत. तसेच भारत अजून १० धावांनी पिछाडीवर आहे.

चहापानापर्यंत ६ फलंदाज बाद 

दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारताचे पहिल्या डावात ६ फलंदाज तंबुत परतले आहेत.  विराट कोहलीची विकेट लवकर पडल्यानंतर अजिंक्य रहाणेने सलामीवीर रोहित शर्मासह भारताचा डाव सांभाळला होता. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी करण्याच सुरुवात केली होती. पण ३९ धावांची भागीदारी झाली असताना रहाणेला ३८ व्या षटकात जेम्स अँडरसनने २७ धावांवर बाद केले आणि ही स्थिरावत चाललेली जोडी फोडली.

पण यानंतर रिषभ पंतने रोहितला साजेशी साथ देण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचीही जोडी खेळपट्टीवर स्थिरावल्याचे वाटत असतानाच बेन स्टोक्सने रोहितला पायचीत करत तोडली. रोहिड डावाच्या ५० व्या षटकात ४९ धावांवर बाद झाला. त्यामुळे त्यांची जोडी ४१ धावांची भागीदारी केल्यानंतर तुटली. त्यापाठोपाठ आर अश्विनही ५९ व्या षटकात जॅक लीचच्या गोलंदाजीवर १३ धावांवर असताना बाद झाला.

सध्या चहापानाच्या विश्रांतीपर्यंत भारताने पहिल्या डावात ६२ षटकात ६ बाद १५३ धावा केल्या आहेत. भारताकडून सध्या रिषभ पंत ६२ चेंडूत ३६ धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर १३ चेंडूत १ धावेवर नाबाद खेळत आहेत. तसेच भारत अजून ५२ धावांनी पिछाडीवर आहे.

विराट शुन्यावर बाद 

भारतीय संघाने १ बाद २४ या धावसंख्येपासून पुढे या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांची जोडी मैदानावर फलंदाजीसाठी उतरली होती. परंतु इंग्लंडचा कर्णधार जो रूटचे जॅक लीचचे अस्त्र वापरत त्यांची जोडी तोडली.

डावातील २४ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या लीचने षटकातील अखेरच्या चेंडूवर पुजाराला १७ धावांवर पायचित केले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फंलदाजीला आलेला विराट कोहली भोपळाही न फोडता पव्हेलियनला परतला. ८ चेंडू शून्य धावेवर बेन स्टोक्सला त्याला त्याला झेलबाद केले.

अशाप्रकारे भारताला लागोपाठ २ धक्के बसले. २७ षटकांनंतर भारतीय संघ ३ बाद ४१ धावांवर आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे नाबाद फलंदाजी करत आहेत.

तत्पुर्वी पहिल्या दिवसाखेर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ७५.५ षटकात २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने शुबमन गिलची स्वस्तात विकेट गमावली होती. वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसनने शून्य धावांवर त्याला पायचित केले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---