भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडनं जैकब ओरम (Jacob Oram) यांची संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तो शेन जर्गेन्सनची जागा घेणार आहे. याआधी तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतही संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. याशिवाय तो झालेल्या टी20 विश्वचषकात संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.
जैकब ओरम (Jacob Oram) म्हणाला, “ब्लॅककॅप्सशी पुन्हा एकदा जोडले जाण्याची संधी मिळाल्यानं मला आनंद होत आहे. माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या संघाशी पुन्हा जोडले जाणे ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे.”
पुढे बोलताना ओरम म्हणाला, “मला नुकत्याच मिळालेल्या संधींमुळे हा संघ कोणत्या दिशेनं जात आहे हे मला खूप खोलवर समजले आणि भविष्यातही असे काम करण्याची संधी मिळेल या विचाराने मला आनंद होतो. न्यूझीलंडच्या गोलंदाजीमध्ये नवीन प्रतिभा उदयास येत आहे आणि मला आशा आहे की, मी माझे ज्ञान आणि अनुभव त्यांच्याशी शेअर करू शकेन जेणेकरून ते त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आव्हानांसाठी उत्तम प्रकारे तयार करू शकतील.”
जैकब ओरमनं 33 कसोटी सामन्यात न्यूझीलंडसाठी 1,780 धावा तसंच 60 विकेट्स घेतल्या आहेत. 160 एकदिवसीय सामन्यात त्यानं 2,434 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 101 राहिली आहे, तर त्यासोबतच त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 173 विकेट्स घेतल्या आहेत. 36 टी20 सामन्यात त्यानं 474 धावा केल्या, तर 19 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनला घडवणाऱ्या आचरेकर सरांंचं मुंबईत स्मारक बनणार! राज्य सरकारचा निर्णय
लखनऊ रोहित शर्माला 50 कोटींमध्ये खरेदी करणार? मेगा लिलावापूर्वी मोठी अपडेट
भारताचे मोठमोठे फलंदाज या युवा फिरकीपटूसमोर गंडले! टीम इंडियात संधी मिळणार का?